Kalyan News Saam Tv News
मुंबई/पुणे

Kalyan Builder: कल्याणमधील धक्कादायक प्रकार उघड; बनावट कागदपत्राच्या आधारे मिळवला अकृषिक दाखला, बिल्डर फरार

Kalyan unauthorised construction: कल्याण डोंबिवली परिसरात अनधिकृत बांधकामांची प्रकरणे सतत समोर येत असतात. याच मालिकेत आणखीन एक भर पडली आहे.

Bhagyashree Kamble

कल्याण डोंबिवली परिसरात अनधिकृत बांधकामांची प्रकरणे सतत समोर येत असतात. याच मालिकेत आणखीन एक भर पडली आहे. वाहनतळ आणि स्मशानभूमीच्या आरक्षणासाठी असलेल्या भूखंडावर बनावट कागदपत्रे सादर करत अकृषिक दाखला मिळवल्याचे प्रकरण उघड झालंय. या प्रकरणी सलमान डोलारे विरोधात अनधिकृत बांधकाम प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

कल्याण येथील कुख्यात बिल्डर सलमान डोलारे यानं तहसील कार्यालयात खोटे कागदपत्रे सादर केले. तसेच स्मशानभूमि आणि वाहनतळासाठी आरक्षित असलेल्या भूखंडाचे अकृषिक प्रमाणपत्र मिळवले. यानंतर तहसील कार्यालयातील कर्मचार्‍यांनी या कागदपत्रांची पडताळणी केली. तर ती कागदपत्रे खोटी असल्याचं निष्पन्न झालं आहे. यानंतर तहसील कार्यालयाने महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.

महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर, तक्रारीच्या आधारे फरार बिल्डर सलमान डोलारेचा शोध पोलीस घेत आहेत. यापूर्वी देखील डोलारे यांच्यावर अनेक अनधिकृत बांधकाम प्रकरणी गुन्हे दाखल झाले आहेत. नुकताच युसुफ हाईट्स या अनधिकृत इमारत प्रकरणी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

कल्याण डोंबिवलीत बनावट कागदपत्रांच्या आधारावर अनधिकृत बांधकामांसाठी शासनाची दिशाभूल करण्याचे प्रकार याआधीही उघड झाले आहेत. परिणामी, अनेक गरजू व गरीब नागरिकांची फसवणूक होत असून, या प्रकारांना आळा घालावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. या प्रकरणामुळे शासन आणि प्रशासन यांची कार्यक्षमता पुन्हा एकदा प्रश्नचिन्हात आली असून, दोषींवर कठोर कारवाईची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Silver Price: २० वर्षांपूर्वी 1KG चांदीची किंमत किती होती? १५०० टक्क्यांनी झाली वाढ

Skin Care : चेहऱ्यावर ब्लीच करण्याआधी 'या' पाच महत्त्वाच्या गोष्टी नक्की जाणून घ्या

Rohit Sharma: रोहित भाऊ, वडापाव खाणार का? चाहत्याच्या प्रश्नावर हिटमॅनने दिलं त्याच्या स्टाईलमध्ये उत्तर, Video व्हायरल

Maharashtra Live News Update : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सुरुपसिंग नाईक अनंतात विलीन...

Amla Benefits: वजन कमी होते, केस गळणे कमी होते...; रोज सकाळी एक आवळा खल्ल्याने होतात हे आरोग्यदायी फायदे

SCROLL FOR NEXT