Police investigate Kalewadi child abuse case after accused arrested in Pimpri-Chinchwad area. saam tv
मुंबई/पुणे

पिंपरी-चिंचवडमध्ये आंब्याचे आमिष दाखवून अडीच वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार

Shocking Crime In Kalewadi: पिंपरी-चिंचवडच्या काळेवाडी परिसरात अडीच वर्षांच्या चिमुरडीवर झालेल्या अत्याचार प्रकरणात पोलिसांनी तातडीने कारवाई करत ४७ वर्षीय आरोपीला अटक केली आहे.

Omkar Sonawane

गोपाल मोटघरे, साम टीव्ही

पिंपरी चिंचवड शहरातील काळेवाडी परिसरातील एकतानगर भागात माणुसकीला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. फक्त अडीच वर्षांच्या चिमुरडीला आंब्याचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी ४७ वर्षीय नराधमाला काळेवाडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. विजय भोसले असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी एकच्या सुमारास ही घटना घडली. आरोपीने पीडित मुलीला आंबा खायला देण्याच्या बहाण्याने आपल्या खोलीत बोलावले आणि तिथे तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. मंगळवारी सकाळी चिमुरडीला त्रास होऊ लागल्याने पालकांनी तिला तातडीने महापालिकेच्या रुग्णालयात दाखल केले. तिथे डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला.

आईने विश्वासात घेऊन विचारले असता, मुलीने आरोपीने घरात बोलावून अत्याचार केल्याचे सांगितले. घटनेचे गांभीर्य ओळखून रुग्णालय प्रशासनाने पोलिसांना पाचारण केले. काळेवाडी पोलिसांनी तत्परता दाखवत एक पथक रुग्णालयात तर दुसरे पथक आरोपीच्या घरी पाठवून त्याला तातडीने अटक केली.

याप्रकरणी पीडित मुलीच्या २८ वर्षीय आईने फिर्याद दिली असून, या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पनवेलमध्ये भाजपच्या दिग्गज नेत्यांची बैठक; प्रदेशाध्यक्षांनी कार्यकर्त्यांना दिला कानमंत्र, ठरवली पुढील रणनीती

साखरेचे दर पुन्हा कडाडणार! साखर उत्पादनात मोठी घट होण्याचा अंदाज; साखरेचे नेमके दर किती वाढणार?

Sheeps Won Thar: ना मेंढरं विकली, ना व्यवसाय सोडला! मेंढरांसोबतच घरी आली रुबाबदार थार

AI in Medical Science: माणूस 1400 वर्षे जगणार? AI माणसाला दीर्घायुषी करणार? AI मुळे वृद्धत्वाची प्रक्रिया थांबणार?

Mandar Kiwale Case: पाच दिवसआधीच ठरला किवळेच्या हत्येचा प्लॅन; आरोपींचं पोलिसांनाच खुलं आव्हान

SCROLL FOR NEXT