arrest, narayangoan Saam Tv
मुंबई/पुणे

Junnar News : नारायणगाव परिसरात चाेरी करणारे गजाआड; टाेळी प्रमुख छकुल्याला अटक

छकुल्यास पुढील तपासासाठी नारायणगाव पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

रोहिदास गाडगे

Junnar News : जुन्नर तालुक्यातील नारायणगाव परिसरात रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन घरफोडी दरोड्यासारख्या गंभीर चो-या करणा-या टोळीच्या प्रमुखास पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. दिपक उर्फ छकुल्या दुधवडे असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. (Junnar Latest Marathi News)

नारायणगाव मांजरवाडी येथे काही दिवसांपुर्वी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी संतोष तुकाराम मुळे यांच्या कापड दुकानाचे पत्रे उचकटून आत प्रवेश करून कपडे, चपला तसेच इतर साहित्य व रोख रक्कम असा एकूण बेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. तसेच शेजारील खत औषधाचे दुकान देखील फोडले होते. याबाबत (junnar) नारायणगाव पोलीस ठाण्यात मुळे यांनी तक्रार दिली हाेती. (Maharashtra News)

रात्रीच्या वेळेस होणाऱ्या अशा प्रकारच्या घरफोडयांना आळा घालण्यासाठी संशयितांना लवकरात लवकर अटक करून गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना पोलिस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिल्या होत्या. या गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना सीसीटीव्ही कॅमेरेच्या आधारे व गोपनीय बातमीदार यांचे आधारे दोन संशयितांना पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेला (LCB) यश आले.

स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घरफोडी व इतर चोरीच्या गुन्ह्यांचे अनुषंगाने माहिती घेत असताना हवालदार दिपक साबळे व संदिप वारे यांना गोपनीय बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की या गुन्ह्यातील संशयित आरोपी दिपक दुधवडे हा बोटा खिंड येथे येणार आहे. तेथे पाेलिसांच्या पथकाने सापळा रचला.

या पथकाने दिपक उर्फ छकुल्या साहेबराव दुधवडे ( वय २१ वर्ष. बिबीचा दरा, म्हसोबा झाप ता. पारनेर जि. अहमदनगर ) याला अटक केली. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने मांजरवाडी येथे केलेल्या गुन्हाची कबुली दिली आहे. छकुल्यास पुढील तपासासाठी नारायणगाव पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. (Breaking Marathi News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Apoorva Nemalekar : “प्रवास सोप्पा नव्हता...'' मालिकेला निरोप देताना अपूर्वाची भावूक पोस्ट व्हायरल

Maharashtra Live News Update: इगतपुरी तालुक्यातील भावली धरण ओव्हर फ्लो

Rupali Bhosle: 'रूप तेरा मस्ताना' रूपाली भोसलेचे फोटो पाहून तुम्हीही हेच म्हणाल...

Politics: 'केम छो शिंदेसाहेब..' जय गुजरातच्या घोषणेवर एकनाथ शिंदेंवर टीकेचा पाऊस, राष्ट्रावादी काँग्रेसच्या आमदारानं डिवचलं

Bhiwandi Police : भिवंडीत गांजा विक्री करणारे तिघे ताब्यात; ३७ लाखाचा गांजा जप्त

SCROLL FOR NEXT