Teacher Passes Away In Accident : गावी निघालेल्या शिक्षकाचा अपघाती मृत्यू

या अपघातानंतर त्यांना बोरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले हाेते.
Parbhani
Parbhanisaam tv
Published On

Parbhani परभणी येथील जिंतूर महामार्गावर ३३ केव्ही उपकेंद्रासमोर दुचाकीचा अपघात होऊन एका शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला. श्रीपाद प्रभाकर वैद्य (४५, रा. पिंपळगाव गायके, ह. मु. बोरी) असे मृत शिक्षकाचे नाव आहे. (Parbhani Latest Marathi News)

श्रीपाद वैद्य हे पिंपळगाव गायके येथे आपल्या गावाकडे रात्री दहा वाजता जात असताना त्यांच्या मोटारसायकलला बोरी येथील 33 वीज उपकेंद्राजवळ अपघात झाला. त्यात त्यांचा म्रुत्यू झाला.

Parbhani
Zilla Parishad School Accident News : जिल्हा परिषद शाळेसमाेर बसच्या धडकेत पादचारी मृत्यूमुखी

या घटनेची माहिती कळताच रस्त्यासमोर असलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना बोरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी तपासणी करून ते मृत झाल्याची घोषणा केली. (Maharashtra News)

Parbhani
Kartiki Ekadashi Yatra Pandharpur : विठुरायाला अकरा लाखांचा सोन्याचा चंदनहार अर्पण

रस्त्याच्या अर्धवट कामामुळे घडलेला अपघात परभणी-जिंतूर (parbhani) महामार्गाचे काम गेल्या पाच वर्षांपासून सुरु आहे. हे काम अत्यंत कासवगतीने होत आहे. या कामाला विलंब होत असल्यामुळे दिवसेंदिवस या रस्त्यावर अपघात वाढले आहेत.

Parbhani
Maharashtra News : पाेलिसांची धडाकेबाज कारवाई; विदेशी, देशी रायफलींसह सहा अटकेत

हा रस्ता जलदगतीने करावा, यासाठी रस्ता संघर्ष समितीच्या वतीने चार हजार नागरिकांचे स्वाक्ष-यांचे निवेदन केंद्रीय बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांना देण्यात आले होते. परंतु या कामाला अद्यापही गती मिळालेली नाही, असा आरोप नागरिकांनी (citizens) केला आह़े. मृत श्रीपाद वैद्य यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. (Breaking Marathi News)

Edited By : Siddharth Latkar

Parbhani
Maya Tigress Video : सुप्रिया सुळे आनंदित; बछड्यासह दिसली सेलिब्रिटी वाघीण ‘माया’ (पाहा व्हिडिओ)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com