जुन्नरमध्ये तरुणीचा खून तर आंबेगावमध्ये अपघाताचा बनाव करत तरुणाची हत्या Saam Tv
मुंबई/पुणे

जुन्नरमध्ये तरुणीचा खून तर आंबेगावमध्ये अपघाताचा बनाव करत तरुणाची हत्या

परिसरात एकच खळबळ उडाली असून या प्रकरणाचा पुढील तपास आता नारायणगाव पोलिस करत आहेत.

रोहिदास गाडगे

पुणे: पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथे एका 19 वर्षीय मुलीची अज्ञात व्यक्तीने निर्घुणपणे हत्या करत मृतदेह पुणे नाशिक मार्गावरील मीना नदीच्या पुलाखाली फेकून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृत मुलीची ही अद्याप ओळख पटली नसून गळा दाबून अज्ञात व्यक्तीने या मुलीची हत्या करत या ठिकाणी मृतदेह फेकून दिल्याने परिसरात एकच खळबळ उडाली असून या प्रकरणाचा पुढील तपास आता नारायणगाव पोलिस करत आहेत.

त्याचबरोबर पुण्याच्या जुन्नर आंबेगाव तालुक्यात खुनांची मालिकाच सुरुच आहे. आज सकाळी १९ वर्षीय तरुणीचा खुन करत मृतदेह मिनानदी पात्रात टाकला तर आज दुपारी मंचरच्या सुलतानपुर रोड वर अपघाताचा बनाव करत तरुणाचा खुन केल्याची घटना समोर आली आहे. पुण्याच्या ग्रामीण भागात खुनांचे सत्र सुरु झाल्याचे वास्तव दिसत आहे. आज सकाळी पुणे नाशिक महामार्गावरील नारायणगाव येथील मिनानदीच्या पुलाखाली अज्ञात १९ वर्षीय तरुणीचा खुन करुन मृतदेह आढळुन आला आहे. या तरुणीची अद्याप ओळख पटली नसुन पिडित मुलीची ओळख पटवणे पोलिसांसमोर मोठं आवाहन आहे.

तर दुसरीकडे आंबेगाव तालुक्यातील मंचर सुलतानपुर रोडवर ओमीनी कार आणि दुचाकीच्या अपघाताचा बनाव करत तरुणाची कोयत्याने वार करत खुन केल्याची घटना समोर आली आहे. ही हत्या जमिनीच्या वादातुन झाल्याचा पोलीसांचा अंदाज आहे. तपासासाठी पुणे ग्रामीण पोलीसांच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आणि मंचर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. आरोपीचा शोध सुरु आहे. गेल्या दोन महिन्यापासुन खेड आंबेगाव जुन्नर तालुक्यात खुनांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. अल्प वयातील तरुणपिढी गुन्हेगारीकडे वाटचाल करत असताना या गुन्हेगारी घटना रोखणं पोलिसांसमोर मोठे आवाहन असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: भोंदू अशोक खरातची प्रकृती बिघडल्याची माहिती

युद्धाच्या नावाखाली सट्टेबाजीचा संशय, शेअर मार्केट घोटाळ्याचं ट्रम्प कनेक्शन?

High Blood Pressure: उन्हात गेल्यावर अचानक BP वाढतोय? वाचा रामबाण घरगुती उपाय

Kokan Top 10 Places: कोकणात फिरायला जात असाल तर ही TOP 10 ठिकाणं नक्की पाहा, हिरव्यागार निसर्गात जाल हरवून

विद्यार्थ्यांना दरमहा 2500 रुपये मिळणार? विद्यार्थ्यांसाठी सरकारची नवी योजना?

SCROLL FOR NEXT