Pune Crime News  Saam Tv News
मुंबई/पुणे

Pune Crime: पुणे हादरले! ७ वर्षांच्या मुलीवर बलात्कार, ऊसतोड कामगाराचं भयंकर कृत्य

Pune Police: पुण्यातल्या जुन्नरमध्ये एका ७ वर्षीय मुलीवर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शेजारी राहणाऱ्या ऊसतोड कामगाराने हे भयंकर कृत्य केले. आरोपीला पोलिसांनी अटक केली.

Priya More

Summary:

  • पुण्यात ७ वर्षीय मुलीवर बलात्कार करण्यात आला

  • पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्यातील ओतूर येथे ही घटना घडली

  • शेजारी राहणाऱ्या ऊसतोड कामगाराने हे भयंकर कृत्य केले

  • याप्रकरणी आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या

रोहिदास गाडगे, पुणे

पुणे जिल्ह्यामध्ये ७ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. जुन्नर तालुक्यातील ओतुर येथे ही घटना घडली. ऊसतोड कामगाराने हे भयंकर कृत्य केले. या प्रकरणी ओतूर पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत त्याला बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेमुळे पुणे जिल्ह्यात खळबळ उडाली. या घटनेमुळे ऊसतोड कामगारांच्या मुलींच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जुन्नर तालुक्यातील ओतूर येथे ही संतापजनक घटना घडली. ७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर ऊसतोड कामगाराने बलात्कार केला. ही घटना मंगळवारी संध्याकाळी उघडकीस आही. शेजारी राहणाऱ्या व्यक्तीनेच हे भयंकर कृत्य केले. देवीदास रोहीदास गर्जे असं आरोपीचे नाव असून तो देखील ऊसतोड कामगार आहे. या प्रकरणी ओतूर पोलिसांनी देवीदासला अटक केली.

पीडित मुलीवर बलात्कार झाल्याचे कळताच तिच्या आई-वडिलांच्या पायाखालची जमीन सरकली. हे कृत्य कोणी केले असता मुलीने शेजारी राहणाऱ्या देवीदासचे नाव घेतले. त्यानंतर मुलीच्या आई-वडिलांनी ओतूर पोलिस ठाण्यात धाव घेत देवीदासविरोधात तक्रार दाखल केली. ओतूर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली.

पोलिसांनी मुलीला पुण्यातील शासकीय रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी पाठवलं असून या घटनेनंतर परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात करून शांतता प्रस्थापित केली. या घटनेमुळे ऊसतोड कामगारांच्या वस्त्यांतील मुलींच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून समाजमनात संतापाची लाट उसळलीय. या प्रकरणाचा पुढील तपास ओतूर पोलिसांकडून सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: विष प्राशन करून शेतकरी महिलेचा मृत्यू

Pune Metro : गणेशोत्सवात पुणेकरांना मोठा दिलासा! दर ५ मिनिटांनी धावणार मेट्रो, जाणून घ्या सविस्तर माहिती

Ratnagiri Beach : चंद्रकोरासारखा दिसतो कोकणातील 'हा' समुद्रकिनारा, नजरेत साठवावे असे सुंदर रुप एकदा पाहाच

Stop eating onions: 30 दिवस कांदा खाल्ला नाही तर शरीरात घडतात ‘हे’ बदल; जाणून घ्या

Building collapse: बांधकाम सुरू असतानाच अचानक कोसळला इमारतीचा मोठा स्लॅब; 15 जणांना वाचवलं, जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू

SCROLL FOR NEXT