Jitendra Awhad Latest News In Marathi  SAAM TV
मुंबई/पुणे

Jitendra Awhad : पालिका अधिकारी मारहाण प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांच्यासह ७ समर्थकांविरोधात FIR दाखल

Jitendra Awhad FIR : पालिका अधिकाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी जितेंद्र आव्हाड यांच्यासह सात जणांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

साम टीव्ही न्यूज नेटवर्क

Jitendra Awhad Latest News : ठाणे महापालिकेचे प्रभारी सहायक आयुक्त महेश आहेर यांना झालेल्या मारहाण प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या सात समर्थकांविरोधात नौपाडा पोलिसांनी एफआयआर नोंदवला आहे.

जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. ठाणे महापालिकेचे अधिकारी महेश आहेर यांचा उल्लेख त्या ऑडिओ क्लिपमध्ये होता. आव्हाड कुटुंबीयांना संपवण्यासाठी तिहार कारागृहातील गँगस्टर सुभाषसिंह ठाकूर उर्फ बाबाजीला सुपारी दिल्याचा उल्लेख होता. (Latest Marathi News)

पोलिसांनी महेश आहेर यांना ताब्यात घेतले होते. त्याचवेळी ठाणे महापालिकेच्या प्रवेशद्वाराजवळच जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांनी आहेर यांना मारहाण केली. या प्रकरणी नौपाडा पोलिसांनी आव्हाड यांच्यासह सात जणांविरोधात एफआयआर दाखल केला आहे.

मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे, नाहीतर...ऋता आव्हाड यांची प्रतिक्रिया

धमकीची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड आणि मुलगी नताशा आव्हाड वर्तकनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यासाठी गेल्या होत्या.

त्याचवेळी त्यांनी पोलीस प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष घालावे, नाहीतर न्यायालयीन लढाई लढावी लागेल, अशी प्रतिक्रिया ऋता आव्हाड यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story: सरकारी नोकरी, लंच ब्रेकमध्ये अभ्यास, तिसऱ्या प्रयत्नात UPSC त पहिला; IAS प्रदीप सिंह यांची सक्सेस स्टोरी

Maharashtra Rail Update: केंद्राचा महाराष्ट्राला गीफ्ट, दोन रेल्वे प्रकल्पांना मंजूरी, शेतकऱ्यांना होणार फायदा

Viral Video: कसं काय पुणेकर! पारा तब्बल १० अंशावर अन् धुक्के; गुलाबी थंडीचा VIDEO पाहाच

Bhiwandi : भिवंडी गूढ धक्क्यांनी हादरली, भूकंप की आणखी काही, शहरात खळबळ

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून मिळणार? तारीख काय? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT