Jitendra Awhad: जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यालयाला छावणीचं स्वरूप

Jitendra Awhad: व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमध्ये आव्हाड कुटुंबीयांना संपवण्यासाठी तिहार जेलमधील गँगस्टर सुभाषसिंह ठाकूर ऊर्फ बाबाजीला सुपारी दिल्याचे समोर आले.
Jitendra Awhad
Jitendra Awhadsaam tv
Published On

>>विकास काटे

Jitendra Awhad : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देणारी एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या क्लिपमध्ये आव्हाड कुटुंबीयांना संपवण्यासाठी तिहार जेलमधील गँगस्टर सुभाषसिंह ठाकूर ऊर्फ बाबाजीला सुपारी दिल्याचे म्हटले आहे.

ठाणे महापालिकेतील सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्या नावाचा उल्लेख या क्लिपमध्ये आहे. पोलिसांनी आहेर यांना ताब्यात घेतले असून जितेंद्र आव्हाड यांच्या संतप्त कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्याच्या बाहेरच आहेर यांना मारहान करण्याचा प्रयत्न केला.

माझ्या मुलीची सुरक्षा मी पाहून घेईन - आव्हाड

जिदेंद्र आव्हाड म्हणाले की, ठाणे महानगर पालिकेतील हा अधिकारी आहे. हा माझ्या मुलीला आणि जावयाला शूटर लावून उडवणार अश्या प्रकारची क्लिप माझ्याकडे आली. बाबाजी नावाचा कोण गुंड आहे त्याच्या नावाने हा अधिकारी धमकी देतो. माझ्या मुलीच्या सुरक्षेचे काय ते मी बघून घेईल. पण ठाणे पोलीस आयुक्त आणि महापालिका आयुक्त काय कारवाई करतात याकडे लक्ष लागले आहे. या अधिकाऱ्याच्या डिग्ऱ्या देखिल बोगस असल्याचे आव्हाड यांनी संगितले. (Latest Marathi News)

Jitendra Awhad
Devendra Fadnavis : 'मी अजून अर्धच बोललोय...' पहाटेच्या शपथविधीवर फडणवीसांचं पुन्हा भाष्य

राष्ट्रवादीच्या कार्यालयाला छावणीचं स्वरुप

महेश आहेर यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यानी मारहान केल्यानतंर ठाण्यातील पाचपखाडी परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यलयाला पोलीस छावणीचे स्वरुप प्राप्त झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकाही कार्यकर्त्याला पोलिसांनी अजूनही ताब्यात घेतले नाही. परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर आमदार जितेंद्र आव्हाड आपल्या नाद या निवासस्थानी निघून गेले आहेत.

Jitendra Awhad
Radhakrishna Vikhe Patil : यांचं कुकर बंद पडलंय, त्यात काही शिजणार नाही; विखे पाटलांची थोरातांवर टीका

महेश आहेर यांच्यावर उपचार सुरू

ठाणे महानगर पालिका अतिक्रमण विभागाचे सहायक आयुक्त महेश आहेर यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्यानंतर ठाण्यातील शासकिय रुग्णालयात त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना ठाण्यातील ज्युपीटर खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com