भरत मोहोळर, साम टीव्ही
मुंबई : तुम्ही चविष्ट असा जिताडा मासा खाण्याची स्वप्न रंगवत असाल तर आता ते स्वप्नच राहू शकतं. कारण, जिताडा मासा समुद्रातून गायब होतोय. मच्छिमारांच्या हातीही आता जिताडा लागत नाहीये. त्यामुळे खवय्येंसह मच्छिमारही हवालदिल झालेयत. जिताडा मिळत नसल्याने रायगडच्या 112 गावांतील मच्छिमारांवर आर्थिक संकट कोसळण्याची शक्यताय. समुद्रात टाकण्यात येणारा भराव, समुद्रात सोडण्यात येणारं केमिकलयुक्त सांडपाणी यामुळे जिताडा, रावस, शेवंड या माशांच्या प्रजाती संकटात सापडल्यात...हा जिताडा खवय्यांच्या का आवडीचा आहे पाहूयात.
जिताडा मासा हा खायला चविष्ट आणि आरोग्यास गुणकारी आहे. अस्थमा रुग्णांसाठीही जिताडा चांगला असल्याचं म्हटलं जातं.
महाग असला तरी खवय्यांकडून जिताडा माशाला विशेष मागणी आहे. खाडीलगतच्या शेतात तळे खोदून माशांचं उत्पादन घेतलं जातं. रायगडच्या अलिबाग, पेण, पनवेलच्या खाडीलगत उत्पन्न अधिक आहे.
हा मासा मंत्री, उद्योगपतींना भुरळ पाडतो अशी जिताडाची ओळख. मात्र जिताडा माशाचं उत्पादन घटत चाललंय...एवढंच नाही तर रावस, पाला, दाडा, ताम, वाम, शेवंड या जातीचंही उत्पादन घटत चाललंय. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील 30 हजार कुटुंबं आर्थिक संकटात सापडलेयत...त्यामुळे जिताडा संवर्धनासाठी ठोस पावलं उचलण्याची गरज आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.