मुंबई : आजपर्यंत सरकारी वा निमसरकारी कर्मचाऱ्यांची आंदोलने ही त्यांच्या संघटनांकडून व्हायची. कोणताही राजकीय पक्ष या संघटनांमध्ये जाऊन आंदोलन करत नाही. सर्व पक्षांनी या मर्यादा पाळल्या होत्या. पण भाजप एनकेन प्रकारे सरकारविरोधी वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे असे राज्याचे जलसंपदामंत्री आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नमूद केले. ते म्हणाले एसटी महामंडळाचे कर्मचारी आमचेच आहेत. त्यांचे प्रश्न लवकर सुटावेत यासाठी सरकार प्रयत्न करीत आहेत. jayant patil on msrtc employee strike bjp anil parab
मंत्री पाटील म्हणाले महाविकास आघाडी सरकारने एसटी कर्मचा-यांकडे कधीच दुजाभावाने पाहिले नाही. त्यांचे प्रश्न सोडविण्याची सरकारची पूर्ण इच्छा आहे. परंतु भाजपचे नेते आंदोलनात पुढे जाऊन बसत आहेत, दंगा करत आहेत, अर्वाच्च बोलत आहेत. या सर्व राजकीय गोष्टी होत असल्यामुळे त्याला राजकीय पद्धतीनेच उत्तर दिले जात आहे असेही पाटील यांनी स्पष्ट केले.
राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब कर्मचाऱ्यांच्या संघटनांशी चर्चा करत आहेत. एसटी कर्मचारी यांचे प्रश्न लवकर सुटावेत, हीच राज्य सरकारची भूमिका आहे असेही जयंत पाटील यांनी नमूद केले
edited by : siddharth latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.