Jayant Patil on Pune Drugs Case saam tv
मुंबई/पुणे

Jayant Patil : विद्येच्या माहेरघराची ओळख 'ड्रग्ज व पब्जचे माहेरघर' अशी झालीय; जयंत पाटील यांची राज्य सरकावर टीका

Satish Daud

मागील काही दिवसांपासून पुणे शहरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. सर्रास ड्रग्जची विक्री तसेच सेवनाच्या अनेक घटना देखील समोर आल्या आहेत. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी संताप व्यक्त केला आहे. सरकारच्या नाकर्तेपणामुळे 'विद्येचे माहेरघर’ अशी ओळख असलेल्या पुण्याची ओळख आज ‘ड्रग्ज व पब्जचे माहेरघर’ झाली आहे अशी टीका त्यांनी केली.

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या एक्स हँडलवरून ही प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या प्रतिक्रियेत ते म्हणतात की, "गेली काही वर्षे पुण्यात गुन्हेगारीने उच्चांक गाठला असून  देशभर गाजलेल्या ललित पाटील प्रकरणानंतर काल पुण्यात काही अल्पवयीन मुलांचे हॉटेल मध्ये ड्रग्ज सेवन करतानाचे व्हिडीओ व्हायरल झाले".

"त्यानंतर पुणे पोलिसांना जाग येऊन त्यांनी त्याठिकाणी छापा टाकला. थोडक्यात काय तर पोलिसांना गुन्ह्यांची माहिती आता त्यांच्या खबऱ्यांकडून मिळत नसून ती सोशल मीडियावर मिळत आहे", असा टोला जयंत पाटील यांनी लगावला.

"अगरवाल पॉर्शे कार अपघात प्रकरणात तर थेट मुलाच्या रक्ताच्या जागी मुलाच्या आईचे रक्त बदलून ठेवण्यात आले. पैशांच्या जोरावर व्यवस्थेला कशाप्रकारे वाकवले जाते, याचे समोर आलेले हे एकमेव उदाहरण आहे. लोकांच्या नजरेसमोर कधीही आले नाहीत, असे हजारो प्रकार असावेत" अशीही शंका जयंत पाटील यांनी व्यक्त केली.

विद्येचे माहेरघर’ अशी ओळख असलेल्या पुण्याची ओळख ‘ड्रग्ज व पब्जचे माहेरघर’ अशी होत असून यामागे सध्याच्या सत्ताधाऱ्यांचा नाकर्तेपणा जबाबदार आहे, असा आरोपही जयंत पाटील यांनी केला आहे.

पुणे शहर हे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे शहर आहे अशी आठवण करून देते. मात्र, पुण्याची जगभर असलेली ओळख पुसून जाऊन हे शहर आज सत्ताधारी भाजपा शिंदे गटाच्या सरकारमुळे बदनाम होत आहे, अशी टीकाही जयंत पाटील यांनी केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Parbhani News: 'सबका बदला लुंगा फिर लौटुंगा', चिठ्ठी लिहली अन् १२ वीतील मुलाने मृत्यूला कवटाळलं; परभणीत खळबळ

VIDEO: राहुल गांधींच्या हस्ते कोल्हापूरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण

Marathi News Live Updates : मुंबई अहमदाबाद महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी

साउथ अभिनेत्याची मेहुणी गाजवणार Bigg Boss 18चं पर्व; केली धमाकेदार एन्ट्री, पाहा VIDEO

Chanakya Niti: आयुष्यात यशस्वी व्हयचंय? फॉलो करा 'हा' गुरु मंत्र

SCROLL FOR NEXT