Maval tourist Rameshchandra Saam Tv News
मुंबई/पुणे

Pahalgam Terror Attack : पुण्यातील मावळच्या सहा वर्षीय मुलीच्या रिल्समध्ये दोन दहशतवादी कैद, लेकीच्या वडिलांनी सांगितला थरारक अनुभव; VIDEO समोर

Pahalgam Terror Attack : पु्ण्यातील मावळच्या देहूरोड मधून रमेशचंद्र यांचे कुटुंब काश्मीरच्या पहेलगाव मध्ये सहलीसाठी गेलं होतं. तिथे आपल्या मुलीचा व्हिडिओ काढत असताना दोन दहशतवादी त्या व्हिडिओत कैद झालेले आहेत.

Prashant Patil

दिलीप कांबळे, साम टिव्ही

पुणे : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव शिगेला पोहोचला आहे. या हल्ल्यात २६ निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला, ज्यात भारतीय नौदलाचे लेफ्टनंट विनय नरवाल यांचाही समावेश होता. याचदरम्यान, आता पु्ण्यातील मावळच्या देहूरोड मधून रमेशचंद्र यांचे कुटुंब काश्मीरच्या पहेलगाव मध्ये सहलीसाठी गेलं होतं. तिथे आपल्या मुलीचा व्हिडिओ काढत असताना दोन दहशतवादी त्या व्हिडिओत कैद झालेले आहेत. त्यानंतर त्यांची सहल आटोपल्यानंतर ते घरी आले. नंतर दोन दिवसांनी हल्ला झाल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की, व्हिडिओत दिसणारे हेच ते आतंकवादी आहेत, जे रेकी करत होते.

'साम टिव्ही'चे प्रतिनिधी दिलीप कांबळे यांनी रमेशचंद्र यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी थरारक अनुभव सांगितला. ते म्हणाले की, '१८ एप्रिल २०२५ला आम्ही पहलगाममध्ये सहलीला गेलो होतो. पहलगामहून साडेसात किलोमीटवर बेताब व्हॅली म्हणून आहे, आणि आम्ही तिथे फिरायला गेलो होतो. तिथे आम्ही आमच्या सहा वर्षीय मुलीचा रिल्स बनवत होतो. आम्ही बनवलेल्या रिलमध्ये ते दोन माणसं कैद झाले होते. आम्ही श्रीनगरमध्ये होतो तेव्हा आम्हाला माहिती झालं की, २२ तारखेला तिथे गोळीबार झाला. श्रीनगरहून आम्ही जम्मूला आलो आणि तिथून आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर सिक्युरिटी फोर्सेसने चार दहशतवाद्यांचा फोटो जारी केला'.

रमेशचंद्र पुढे म्हणाले की, 'त्या चार दहशतवाद्यांचा फोटो पाहिल्यानंतर आम्ही हैराण झालो. त्यामधील दोन जणांचे फोटो आम्हाला ओळखीचे लागले. मी आणि माझ्या बायकोने रात्रभर पहलगाममध्ये काढलेले फोटो आणि व्हिडिओ शोधले, आणि माझ्या मुलीच्या व्हिडिओमध्ये हे दोन दहशतवादी चालताना दिसले. हे दोघं आम्हाला या कारणामुळे संशयित वाटले की, माझ्या मुलीने साधा ड्रेस घातला असून त्या दोघांनी हिवाळ्यातील गरमी देणारे काश्मीरी कपडे घातलेले होते.' असा अंगावर शहारा आणणारा अनुभव सांगितला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhakari Tips: कोणत्या व्यक्तींनी बाजरी आणि नाचणीची भाकरी खाणं टाळावे?

भाजप पदाधिकाऱ्याच्या घरात बॅग भरून पैसे, स्वतः निलेश राणेंनी केलं स्टिंग ऑपरेशन राणेंची धाड|VIDEO

Vande Bharat Train: वंदे भारत स्लीपर, अमृत भारत; २०२६ मध्ये लॉन्च होतील नवीन ट्रेन; असतील हजारो खास फीचर्स

Pune Accident : पुण्यात पुन्हा भीषण अपघात; महामार्गावर ४ वाहनांची एकमेकांना धडक

Maharashtra Live News Update: हसन मुश्रीफ यांची पुन्हा शिवसेनेचे माजी खासदार संजय मंडलिक यांच्यावर टीका

SCROLL FOR NEXT