Jaipur-Mumbai Express Chetan Singh Update Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Crime News : मुंबई-जयपूर एक्सप्रेसमधील गोळीबाराचं रहस्य उलगडलं; पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड

Jaipur-Mumbai Express Chetan Singh Update : चेतनसिंग चौधरीने फायरिंग का केली याचं धक्कादायक कारण देखील आता समोर आलं आहे.

प्रविण वाकचौरे

सचिन गाड

Jaipur-Mumbai Express Firing Update :

जयपूर-मुंबई एक्स्प्रेस गोळीबारप्रकरणी बडतर्फ आरपीएफ कॉन्स्टेबल चेतनसिंग चौधरीविरुद्ध मुंबई पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले आहे. चौधरी याच्यावर 31 जुलै रोजी चालत्या ट्रेनमध्ये आपल्या वरिष्ठ सहकाऱ्यांची आणि तीन प्रवाशांची गोळ्या झाडून हत्या केल्याचा आरोप आहे.

मात्र चेतनसिंग चौधरीने फायरिंग का केली याचं धक्कादायक कारण देखील आता समोर आलं आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या जबाबात मोठा उलगडा झाला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

जयपूर-मुंबई एक्सप्रेसमधील गोळीबाराचं रहस्य उलगडलं आहे. २६/११ मुंबई हल्ल्याचा बदला म्हणून चेतनसिंहने तीन मुस्लीम बांधवांची हत्या केली आहे. ट्रेनमध्ये असताना आरोपी चेतनसिंह चौधरी याबाबत बरळत होता. प्रत्यक्षदर्शींना याबाबत माहिती दिली आहे.

पोलिसांना कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचण्यापूर्वी 150 हून अधिक साक्षीदारांच्या साक्ष नोंदवल्या आहेत. साक्षीदारांच्या साक्षीशिवाय, तपासकर्त्यांनी ट्रेनच्या आतील सीसीटीव्ही फुटेजवर देखील पाहिले. जिथे चेतनसिंह आपलं टार्गेट शोधताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये आरोपी मुस्लीम आणि पाकिस्तानबद्दल अनेक अपशब्द बोलत असल्याचे ऐकू येत आहे.

आरोपीची मानसिकस्थिती स्थीर

आरोपीविरोधात पोलिसांनी जवळपास १००० पानांचं आरोपपत्र दाखल केलं आहे. आरोपपत्रात आरोपीच्या बिघडलेल्या मानसिक स्थितीचा कुठेही उल्लेख नाही. सुरुवातीला आरोपी चेतनसिंग रागीट आणि मानसिकदृष्ट्या अस्थिर असल्याचे बोलले जात होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Video Viral: रिलसाठी काहीपण!!! धावत्या लोकलमध्ये लटकत तरूणीचा स्टंट, अंगावर काटा आणणारा व्हिडीओ

Maharashtra Live News Update: मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर वाहतूक कोंडी

Gold Rate Today : सोन्याच्या किंमतीत मोठी वाढ, प्रति तोळा इतक्या रूपयांनी महागलं, वाचा 24K,22K आणि 18K चा दर

Easy Hairstyles: कोणत्याही लूकवर करता येतील अशा 5 सोप्या हेअरस्टाईल्स

Mobile Use Eye Problems : मोबाईल जास्त वेळ पाहिल्याने डोळ्यांवर काय परिणाम होतो? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT