Yes! I am Sharad Pawar's man: Sanjay Raut Saam TV
मुंबई/पुणे

होय! मी शरद पवारांचा माणूस : संजय राऊत

Sanjay Raut Latest News: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेत राऊतांवरील कारवाईचा मुद्दा उपस्थित केला असल्याचं त्यांनी स्वतः सांगितलं होतं.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: दोन दिवसांपूर्वी ईडीने (ED) संजय राऊत यांच्या संपत्तीवर टाच आणली. यावेळी संजय राऊत अधिवेशनासाठी दिल्लीत होते. ते काल (७ एप्रिलला) परत मुंबईत आले आहे. त्यांचं शिवसेनेकडून जल्लोषी स्वागत करण्यात आले होतं. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. "मी शरद पवारांचा माणूस आहे, हे जगजाहीर आहे, यात काही लपवण्यासारखं नाही" असं वक्तव्य संजय राऊतांनी केलं. (It’s no secret that I am Sharad Pawar’s man: Shivsena MP Raut)

हे देखील पहा -

शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी गुरुवारी सांगितले की, हे सर्वज्ञात सत्य आहे की ते राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचे माणूस (सहकारी) आहेत आणि दोघांमध्ये चांगले संबंध आहेत. ज्यामुळे 2019 मध्ये महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्यात मदत झाली. पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्लीत भेट घेऊन अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) राऊत यांची संपत्ती जप्त केल्याचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

याबाबत भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राऊतांवर निशाणा साधला आहे. पाटील म्हणाले की, "संजय राऊत हे उद्धवजींचे किंवा शिवसेनेचे नव्हेत तर शरद पवारांचेच आहे, हे त्यांनी स्वतः सागितलं आहे." अस म्हणत त्यांनी राऊत यांची तात्काळ खिल्ली उडवली. तसेच ते त्यांच्याच पक्षाचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा पवारांच्या जवळ असल्याचे दिसून येते असंही पाटील म्हणाले.

मंगळवारी, ईडीने काही जमीन व्यवहारांशी संबंधित मनी-लाँडरिंग तपासात राऊतांची पत्नी आणि त्यांच्या दोन साथीदारांची 11.15 कोटी रुपयांहून अधिक मालमत्ता जप्त केली होती. यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेत राऊतांवरील कारवाईचा मुद्दा उपस्थित केला असल्याचं त्यांनी स्वतः सांगितलं होतं.

याबाबत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही राऊतांवर निशाणा साधला होता, राणे म्हणाले की, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? काळा पैसा मिळवायचा, अन् कारवाई झाली की बोंबलायचं. त्यानंतर केलेली पापं झाकण्यासाठी शक्ती प्रदर्शन करायचं. यातून जनतेने काय बोध घ्यावा? संजय राऊत यांचं लक्ष पक्षप्रमुख पदावर की मुख्यमंत्री पदावर?' असं ट्विट राणेंनी केलं.

संजय राऊत हे ‘सामना’ चे कार्यकारी संपादक देखील आहेत, शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोघेही वैचारिकदृष्ट्या वेगळे असले तरी राऊतांचे पवारांशी घनिष्ठ संबंध आहेत. शिवसेनेचे संस्थापक दिवंगत बाळ ठाकरे यांचेही शरद पवारांशी चांगले संबंध होते. त्यामुळेच 2019 मध्ये, शिवसेनेने भाजपशी युती तोडली आणि त्यांच्या वैचारिक प्रतिस्पर्धी असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी हातमिळवणी करून महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. यात पवार हे त्या तीन पक्षांच्या आघाडीचे प्रमुख शिल्पकार होते.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: धोरणात हिंदी, भाषणात मराठी, ठाकरे गटाचा दुटप्पीपणा जनतेला मान्य नाही - बावनकुळे

Sushil Kedia: काल म्हणाला मराठी बोलणार नाही, आज सुतासारखा सरळ झाला; सुशील केडीया म्हणाला मराठी फडाफडा बोलेल, पाहा VIDEO

Sai Tamhankar : बिनधास्त सईचा स्वॅग लय भारी, पाहा हटके PHOTOS

Vijay Melava: मी अनेक गोष्टी बोललो तर बोलायला जागा राहणार नाही; राज ठाकरेंच्या टीकेला दरेकरांचं प्रत्युत्तर

Marathi Bhasha Vijay: मनसेचा दणका! राज ठाकरे माझे हिरो आहेत – सुशील केडियाचा माफीनामा|VIDEO

SCROLL FOR NEXT