मुंबईच्या विकासासाठी मुंबई-मीरा-भाईंदर कनेक्टिव्हिटी वाढवणं महत्त्वाचं - आदित्य ठाकरे Saam Tv
मुंबई/पुणे

मुंबईच्या विकासासाठी मुंबई-मीरा-भाईंदर कनेक्टिव्हिटी वाढवणं महत्त्वाचं - आदित्य ठाकरे

या मार्गामुळे दहिसर पश्चिम ते भाईंदर दोन्ही शहरांदरम्यानचा प्रवासाचा वेळ कमी होणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: मुंबई शहर व उपनगरांच्या विकासकामांमध्ये मुंबई-मीरा-भाईंदर येथील कनेक्टिव्हिटी वाढविणे, महत्त्वाचे आहे असं मत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे. आपल्या ट्विटमध्ये ते म्हणाले की, मुंबई महानगरपालिका (BMC) दहिसर लिंक रोडपासून भाईंदरपर्यंत ६ किमी लांब आणि ४५ मीटर रुंद रस्ता बांधणार आहे. MCGM च्या हद्दीत १.५ किमी व ४.५ किमी रस्ता मीरा भाईंदर (Mira Bhayandar) पालिकेकडे असेल. दक्षिणेकडील प्रस्तावित कोस्टल रोडचा हा भाग अत्यंत महत्त्वाचा असून या ६ किमी रस्त्याचे काम महानगरपालिका युद्धपातळीवर पूर्ण करेल. (It is important to increase Mumbai-Mira-Bhayander connectivity for the development of Mumbai - Aditya Thackeray)

हे देखील पहा -

पुढे ते म्हणाले की, या मार्गामुळे दहिसर पश्चिम ते भाईंदर दोन्ही शहरांदरम्यानचा प्रवासाचा वेळ कमी होईल. तसेच दहिसर पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्गावरील वाहतुकीचा ताण कमी होईल, शिवाय हा मार्ग पश्चिम द्रुतगती मार्गाशीही जोडण्यात येईल. या कामात केलेल्या सहकार्याबद्दल आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, महापौर किशोरी पेडणेकर यांचे तसेच BMC आयुक्त इकबाल सिंह चहल, एमएमआरडीएचे आयुक्त श्रीनिवास, MBMC आयुक्त ढोले यांचे आभार मानले आहेत.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: आगामी महानगरपालिका निवडणूकिच्या पार्श्वभूमीवर सोलापूर भाजपमध्ये जम्बो पक्षप्रवेश

Tridashansh Yog: अवघ्या काही तासांनी गुरु-बुध तयार करणार त्रिदशांश योग; 'या' राशींच्या नशीबी येणार अखेर श्रीमंती

Jalna News: मोठी बातमी! महानगरपालिकेच्या आयुक्तांना १० लाखांची लाच घेताना अटक

Bjp vs Shivsena: दिवाळीआधीच महायुतीत वादाचे फटाके, 'ठाण्यात भाजपचा महापौर होणार' भाजपचा स्वबळाचा नारा

Nashik Politics: नाशिकमध्ये भाजपची जबरदस्त खेळी; कोकाटेंचा भाजपमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT