Crime NEws saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Crime News : धावत्या ट्रेनमध्ये कॉलेजच्या विद्यार्थिनीची छेड, दुसऱ्या तरुणीला स्टेशनवरील लिफ्टमध्ये मारली मिठी

Mumbai Women Safety Issue : सीएसएमटी आणि मस्जिद रेल्वे स्टेशनदरम्यान तरुणीचा धावत्या लोकलमध्ये विनयभंग आणि मारहाण करण्यात आली. तर अंधेरीत लिफ्टमध्ये तरुणीचा विनयभंग.

प्रविण वाकचौरे

Mumbai News :

मुंबईतील दोन घटनांमुळे महिला सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. सीएसएमटी आणि मस्जिद रेल्वे स्टेशनदरम्यान तरुणीचा धावत्या लोकलमध्ये विनयभंग आणि मारहाण करण्यात आली.

तर दुसऱ्या घटनेत अंधेरी रेल्वे स्टेशनमधील लिफ्टमध्ये तरुणीचा विनयभंग करण्यात आला. या आरोपीला पोलिसांना अटक केली आहे. टाईम्स ऑफ इंडियाने हे वृत्त प्रसिद्ध केलं आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पहिल्या घटनेत बुधवारी सकाळी २३ वर्षीय तरुणी कॉलेजला निघाली होती. सीएसएमटीहून पनवेलच्या दिशेने जाणारी लोकल या तरुणीने पकडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवासादरम्यान तरुणी लोकलच्या डब्यात एकटीच होती. ट्रेन सुरु झाल्यानंतर काही वेळातच धावत्या ट्रेनमध्ये एकजण डब्यात चढला. त्याने खांद्यावर शाल ओढली होती. आरोपी तरुणीसोबत छेडछाड सुरु केली. त्यावेळी तरुणीने या व्यक्तीला ट्रेनमधून उतरण्यास सांगितले, त्यावरून दोघांमध्ये वाद झाला. त्यांतर आरोपीने तिला शिवीगाळ करत धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली.

या वादात त्या व्यक्तीने तरुणीच्या चेहऱ्यावर ठोसा देखील मारला. मात्र मोठ्या हिमतीने तरुणीने आरोपीचा जोरदार प्रतिकार केला, त्याला चपलेने मारहाण केली. दरम्यान शेजारील अपंगांच्या डब्यातील एका प्रवाशाने देखील आरोपीना मोठ्याने ओरडून विरोध केला.

त्यानंतर आरोपीने घाबरून मस्जिद स्थानकात जाण्यापूर्वी ट्रेनमधून उडी मारली. तरुणीने नंतर सीएसएमटी जीआरपी चौकीत घडलेल्या प्रकाराची तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपास करुन आरोपी कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याच्या शोधासाठी पथके तयार करण्यात आल्याची माहिती दिली.

अंधेरीत लिफ्टमध्ये तरुणीचा विनयभंग

दुसरी घटना अंधेरी रेल्वेस्थानकात घडली आहे. एक २६ वर्षीय तरुणी अंधेरीच्या प्लॅटफॉर्म ३ वर उतरली. मात्र तिच्यासोबत सामान असल्याने तिने लिफ्टने जाण्याचा निर्णय घेतला. लिफ्टमध्ये प्रवेश केल्यानंतर काही वेळातच एक व्यक्ती देखील लिफ्टमध्ये शिरला.

दार बंद झाल्यावर त्या व्यक्तीने तरुणीच्या जवळ येण्याचा प्रयत्न केला. मात्र तरुणीने मदतीसाठी आरडाओरडा सुरु केला. लिफ्टचे दरवाजे उघडताच आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु होमगार्डने त्याला पाठलाग करून पकडले. इशबू पटेल असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी आरोपीवर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Politics: मधुरिमाराजेंच्या माघारीची INSIDE STORY; कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काय घडलं?

Assembly Election: एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये संघर्ष; शिंदेविरुद्ध दोन ठाकरे

Maharashtra Election: महायुतीनं केलंय काम भारी! लाडक्या बहिणींना मिळणार २१०० रुपये, कोल्हापुरात महायुतीची १० वचनं

Maharashtra News Live Updates: भाजपचा मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना पाठिंबा

Uddhav Thackeray: पीएम मोदींच्या अशुभ हातांनी बांधलेला पुतळा पडला'; उद्धव ठाकरेंची टीका

SCROLL FOR NEXT