Marathi Hindi Language Controversy Saam tv
मुंबई/पुणे

Marathi Hindi Language Controversy : "मराठी बोलना जरुरी हैं क्या ?" म्हणणाऱ्या खारघरमधील परप्रांतीय तरुणाला मनसे कार्यकर्त्यांनी धडा शिकवला

Kharghar News : नवी मुंबईच्या खारघरमध्ये "मराठी बोलणं गरजेचं आहे का?" असा प्रश्न विचारणाऱ्या सुरज यादवने अखेर जाहीर माफी मागितली. या प्रकारावर स्थानिक नागरिक आणि मनसेच्या दबावामुळे यादवला माघार घ्यावी लागली.

Alisha Khedekar

  • खारघरमध्ये सुरज यादवच्या मराठीविरोधी वक्तव्यामुळे वाद निर्माण.

  • "मराठी बोलणं गरजेचं आहे का?" असा सवाल करत मराठीचा अवमान.

  • स्थानिक नागरिक आणि मनसेच्या दबावामुळे यादवने अखेर माफी मागितली.

  • सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया; भाषिक अस्मितेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर.

राज्यात मराठी हिंदी भाषेचा वाद सुरु असून नवी मुंबईतील खारघरमध्ये एका परप्रांतीय व्यक्तीने मराठी भाषेबाबत दाखवलेल्या मुजोरपणामुळे वाद चिघळला आहे. स्थानिक नागरिकांच्या आक्रमक भूमिकेमुळे अखेर संबंधित तरुणाला जाहीर माफी मागावी लागली. ‘मराठी बोलना जरूरी है क्या सबको?’ असा सवाल विचारणाऱ्या या तरुणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला असून, त्यावर नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

नवी मुंबईतील खारघर येथे सुरज यादव नावाचा मुलगा पिठाची गिरणी चालवतो. गेल्या अनेक महिन्यांपासून या दुकानावर हिंदी भाषेतील पाटी लावण्यात आली होती. ज्यामध्ये गिरणीत मिळणाऱ्या सर्व वस्तूंची यादीही हिंदीत लिहिण्यात आली होती. खारघरच्या या भागात मराठी भाषिकांची संख्या जास्त असून स्थानिक नागरिकांनी त्याला मराठी पाटी लावण्याची वारंवार विनंती केली.

मात्र, यादवने याकडे वारंवार दुर्लक्ष केलं आणि उर्मटपणे प्रतिक्रिया देत, “मराठी बोलना जरूरी है क्या सबको?” असं विचारत मराठी भाषेचा अवमान केला. या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली. याबाबत स्थानिकांनी मनसेच्या शाखेत तक्रार दाखल केल्यानंतर मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत यादवला जाहीर माफी मागायला लावली.

व्हायरल झालेल्या व्हिडीओत हा संपूर्ण प्रकार दाखवण्यात आला असून संबंधित तरुण स्थानिकांच्या प्रश्नांना सरळ उत्तर न देता उर्मटपणे बोलून टाळाटाळ करताना दिसतो आहे. स्थानिकांनी आग्रह केल्यानंतरही यादवने सुरूवातीला उडवाउडवीची उत्तरं दिली, अखेर स्थानिकांकडून आलेले दडपण आणि कार्यकर्त्यांच्या दबावामुळे या तरुणाला माफी मागावी लागली.

खारघरमध्ये काय प्रकार घडला?

सुरज यादव या परप्रांतीय तरुणाने "मराठी बोलणं गरजेचं आहे का?" असा अवमानजनक सवाल विचारल्यामुळे वाद निर्माण झाला.

स्थानिक नागरिकांची भूमिका काय होती?

स्थानिक नागरिकांनी मराठी पाटी आणि भाषेचा सन्मान राखण्याची मागणी करत आक्रमक भूमिका घेतली.

मनसेने यात काय भूमिका घेतली?

मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करून यादवला जाहीर माफी मागायला लावली.

सोशल मीडियावर याचा काय परिणाम झाला?

संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Care : लांब आणि जाड केसांसाठी जादुई नुस्खा, फक्त वापरा या घरगुती गोष्टी

Jaipur Accident: हायवेवर रात्री भयानक अपघात! भरधाव कारने १६ जणांना उडवले, अन्...

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात पगारवाढ कधी? एरियर किती मिळणार? वाचा कॅल्क्युलेक्शन

Maharashtra Live News Update : नाशिक महापालिका निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात नेत्यांच्या सभांना वेग

पुण्यातील गुंडगिरीला कोण जबाबदार? अजित पवारांनी थेट नाव घेतलं, एका वाक्यात विषय संपवला, पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT