Sameer Wankhede  Saam Tv
मुंबई/पुणे

Sameer Wankhede On CBI Raids: सीबीआयच्या छापेमारीनंतर समीर वानखेडेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, 'देशभक्त असल्याची...'

Sameer Wankhede On CBI Raids: सीबीआयने वानखेडे यांच्या घरावरही छापे टाकले आहेत. या साऱ्या प्रकारानंतर समीर वानखेडे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे

Vishal Gangurde

Sameer Wankhede News : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. सीबीआयने समीर वानखेडे यांच्या विरोधात भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयने वानखेडे यांच्या घरावरही छापे टाकले आहेत. या साऱ्या प्रकारानंतर समीर वानखेडे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. (Latest Marathi News)

एनसीबीचे माजी अधिकारी आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांच्या घरावर तब्बल १३ तास छापेमारी झाली. सीबीआयच्या दहा ते बारा अधिकाऱ्यांकडून ही छापेमारी १२ मे रोजी सायंकाळी साडेचार वाजल्यापासून छापेमारी सुरू झाली होती. गोरेगाव येथील राहत्या घरी सीबीआयची छापेमारी सुरू होती. या संपूर्ण प्रकारानंतर समीर वानखेडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

समीर वानखेडे म्हणाले, 'सीबीआयने माझ्या घरावर छापा टाकला होता. १२ तासांपेक्षा अधिक वेळ झडती घेतली. छापेमारीमध्ये 18 हजार रुपये आणि मालमत्तेसंदर्भातील काही कागदपत्रे सीबीआयने जप्त केली. मी सेवेत रुजू होण्यापूर्वी ही मालमत्ता खरेदी केली होती. देशभक्त असल्याची मला शिक्षा मिळत आहे'.

'६ अधिकाऱ्यांच्या पथकाने अंधेरीतती माझ्या वडिलांच्या घरावर छापा टाकला. त्यांना घरात काही सापडलं नाही. सीबीआयच्या ७ अधिकाऱ्यांच्या दुसऱ्या पथकाने माझ्या सासरच्या घरीही छापे टाकले. माझे सासू-सासरे वृद्ध आहेत, असंही वानखेडे पुढे म्हणाले.

कोणत्या प्रकरणी छापेमारी करण्यात आली?

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता किंग खान अर्थातच शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ऑक्टोबर २०२१ रोजी एनसीबीकडून अंमली पदार्थांप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यावेळी आर्यनची सुटका व्हावी यासाठी वानखेडे यांनी कथित लाच मागितल्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.

कॉड्रेलीया क्रूझवर आर्यन खान अंंमली पदार्थांप्रकरणात समीर वानखेडे आणि इतरांनी २५ कोटींची मागणी केली आणि ५० लाख खंडणी घेतल्याचा आरोप सीबीआयच्या एफआयआरमध्ये करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : 48 तासांसाठी विदर्भात पावसाचा ऑरेंज अलर्ट

Viral Video : मैदानात मुलांसोबत फुटबॉल खेळणारी गाय; व्हिडिओ पाहून डोक्याला हात लावाल

मोठी बातमी! रायगडमध्ये समुद्रात संशयास्पद बोट आढळली, पाकिस्तानची बोट असण्याची शक्यता

Monday Horoscope : सावधान! वेळ आणि पैसा वाया जाणार; 5 राशींच्या लोकांची चिंता वाढवणार

मोठी बातमी! ८-९ जुलैला राज्यातील कोणतीही शाळा बंद नाही, शिक्षण विभागाने काढले आदेश

SCROLL FOR NEXT