MahaRERA Halts Pune Real Estate Projects saam tv
मुंबई/पुणे

Real Estate: घर घेताय सावधान! राज्यात 4904 प्रकल्पांत अनियमितता, ग्राहकांचे कोट्यवधी रुपये अडकले

MahaRERA Halts Pune Real Estate Projects: राज्यातील ४९०४ गृहप्रकल्पांत गंभीर अनियमितता आढळून आली आहे. यामुळे ग्राहकांचे कोट्यवधी रुपये अडकले आहेत. घराचा ताबा मिळण्यास विलंब होत असून अनेकांना आर्थिक फटका बसत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

  • पुण्यातील अनेक गृहप्रकल्पांना 'महारेरा'ने स्थगिती दिली आहे.

  • विकासकांच्या हलगर्जीपणामुळे खरेदीदारांना मालमत्तेचा ताबा मिळत नाही.

  • खरेदीदारांचे कोट्यवधी रुपये अडकले असून ईएमआय आणि मानसिक तणाव वाढतो आहे.

  • महारेराकडून जिल्हानिहाय स्थगित प्रकल्पांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

मध्यमवर्गीयाच्या स्वप्नातील घर आता अनेकांसाठी ईएमआय आणि मानसिक तणावामुळे एक दुस्वप्न ठरावं अशी परिस्थिती आहे. पुण्यातील अनेक रिअल इस्टेट प्रकल्पांना 'महारेरा'ने 'स्थगिती' दिलीय. विकासकांचा हलगर्जीपणा आणि पारदर्शकतेचा अभाव यामुळे खरेदीदारांना मालमत्ता हस्तांतरण किंवा परतावा मिळत नाहीय. त्यामुळे खरेदीदारांचे कोट्यवधी रुपये गृहप्रकल्पात अडकले. जिल्हानिहाय स्थगित प्रकल्पांची स्थिती काय आहे पाहूयात.

जिल्हानिहाय स्थगित प्रकल्पांची स्थिती

पुणे- 1244

ठाणे- 548

रायगड - 473

मुंबई उपनगर - 441

नाशिक- 250

नागपूर - 247

आर्थिक नियोजनाचा अभाव आणि कायदेशीर बाबींकडे दुर्लक्ष यामुळे अनेक खरेदीदारांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. 'महारेरा'ने आता जरी कठोर पावले उचलली असली, तरी ग्राहकांना तत्काळ दिलासा मिळणे गरजेचे आहे. तसचं गुंतवलेली रक्कम परत मिळवण्यासाठी आणि प्रकल्प पूर्ण करण्यासाठी ठोस उपाययोजना करायला हव्यात. अन्यथा स्वप्नातील घरं हे स्वप्नच राहील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: - धुळे येथील बंधाऱ्याच्या भिंतीची उंची अधिकाऱ्यांनी कमी केल्यामुळे शेतकरी आणि ग्रामस्थांना फटका

MPSC Exam 2025 Date : महत्वाची बातमी! MPSC परीक्षा पुढे ढकलली, आता या तारखेला होणार परीक्षा

Asia Cup 2025 Final: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याआधी टीम इंडियाला धक्का; फायनलमध्ये सूर्यकुमार यादव खेळणार की नाही?

नाचणाऱ्या कलेक्टरविरोधात वातावरण तापलं, शेतकरी-पोलीस आमने-सामने, VIDEO

Asia Cup 2025 फायनलपूर्वी पाकिस्तानचा मोठा निर्णय, संपूर्ण स्पर्धेवर टाकला बहिष्कार

SCROLL FOR NEXT