Iqbal Kaskar  Saam Tv
मुंबई/पुणे

Iqbal Kaskar: इक्बाल कासकरला न्यायालयीन कोठडी

इक्बाल कासकर (Iqbal Kaskar) याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

सुरज सावंत

मुंबई : आंतरराष्ट्रीय दहशतवादी आणि भारताकरिता मोस्ट वाँटेड असलेल्या दाऊद इब्राहिम (Daud Ibrahim) याचा भाऊ इक्बाल कासकर (Iqbal Kaskar) याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. यापूर्वी PLMA न्यायालयाने इक्बाल कासकरला 25 फेब्रुवारीपर्यंत ईडी कोठडी सुनावली होती (Iqbal Kaskar remanded in judicial custody).

इक्बाल कासकर (Iqbal Kaskar) च्या वकिलांनी न्यायालयात एक अर्ज दाखल केला होता. ज्यामध्ये इक्बाल कासकर ईडी (ED) कोठडीत असताना त्याच्या काही इंग्रजी भाषेतील कागदपत्रांवर स्वाक्षरी घेतल्याची माहिती देण्यात आली आहे. इक्बाल कासकर याना इंग्रजी भाषा कळत नसल्याची त्यांच्या वकिलांची माहिती आहे.

कासकरला डायबिटीज असल्याने जेलमध्ये नेण्याआधी त्याला जेवण देण्याची कासकरच्या वकिलांची मागणी होती. न्यायालयाने ही मागणी मान्य करत ईडी कार्यालयात कासाकरला जेवण देऊन मग ठाणे जेलमध्ये नेण्याचे आदेश दिले आहेत.

दाऊद इब्राहिम (Daud Ibrahim) कासकर हा इक्बालचा भाऊ असून तो आंतरराष्ट्रीय गुंड आहे. त्याच्यावर अंमली पदार्थ, शस्त्र तस्करी, स्फोटक तस्करी करण्याचे आरोप आहे. दाऊदचे दहशतवादी संघटनांशीही संबध असून राजकीय नेते, व्यावसयिक यांनाही धमकवल्याचे तपासात समोर आले आहे. खंडणीद्वारे यांनी अनेकांकडून पैसे उकळले आहेत. असंख्य गुन्हे या टोळीच्या विविध सदस्यांवर मुंबईच्या विविध पोलिस ठाण्यात दाखल आहेत.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगावात भीषण अपघात; टँकरच्या धडकेत भाजी विक्रेत्या महिलेचा मृत्यू, मुलगा जखमी

Maharashtra Politics : फडणवीस-शिंदे असते तर गुंगा गुड्डा म्हटले असते, राऊतांच्या वक्तव्याने वाद उफळणार?

Morning Exercise: सकाळी उठताच फक्त ५ मिनिटे करा 'हे' व्यायाम; दिवसभर राहाल उत्साही आणि फ्रेश

Eknath Shinde : सिद्धिविनायक मंदिर देणगी घोटाळा प्रकरणात एकनाथ शिंदेंचे तातडीचे आदेश, ठाकरे सेना अडचणीत येणार?

Rohit Sharma: रोहित शर्मा स्वतःहून निवृत्ती घेणार नाही; मोहम्मद कैफच्या वक्तव्याने रंगली नवी चर्चा

SCROLL FOR NEXT