Iqbal Kaskar remanded in ED custody till February 25 by PLMA court Saam Tv
मुंबई/पुणे

Iqbal Kaskar: PLMA कोर्टाकडून इक्बाल कासकरला २५ फेब्रुवारीपर्यंत ईडी कोठडी

Iqbal Kaskar Arrested: ईडीच्या PLMA कोर्टाने इक्बाल कासकरला ७ दिवसांची म्हणजेच २५ फेब्रुवारीपर्यंत ईडी कोठडी दिली आहे.

सुरज सावंत

मुंबई: मनी लाँड्रिंग (Money laundering) प्रकरणी ईडी दाऊदचा भाऊ इक्बाल कासकर याला अटक (Arrested) करण्यात आली होती. इक्बालची कोठडी मिळविण्याकरिता ईडीने मकोका कोर्टात अर्ज करण्यात आला होता. त्यानुसार ईडीच्या PLMA कोर्टाने इक्बाल कासकरला (Iqbal Kaskar) ७ दिवसांची म्हणजेच २५ फेब्रुवारीपर्यंत ईडी कोठडी (ED Custody) दिली आहे. इक्बाल कासकरच्या बाजूने युक्तीवाद करण्यासाठी एका वकिलाने न्यायालयात परवानगी मागितली. न्यायालयाने परवानगी देत वकालतनाम्यावर स्वाक्षरी घेण्यास सांगितली. ईडीच्या वकिलांनी युक्तिवादाला सुरूवात करत २०१७ मध्ये खंडणीच्या गुन्ह्यात इक्बलला अटक केली. इक्बालवर मकोका अंतर्गत गुन्हे दाखल असून डी कंपनी नावाची गॅंग हे चालवत असल्याचा आरोप आहे. (Iqbal Kaskar remanded in ED custody till February 25 by PLMA court)

हे देखील पहा -

दाऊद इब्राहिम कासकर हा इक्बालचा भाऊ असून तो आंतरराष्ट्रीय गुंड आहे. त्याच्यावर अंमली पदार्थ, शस्त्र तस्करी, स्फोटक तस्करी करण्याचे आरोप आहे. दाऊदचे दहशतवादी संघटनांशीही संबध असून राजकीय नेते, व्यावसयिक यांनाही धमकवल्याचे तपासात समोर आले आहे. खंडणीद्वारे यांनी अनेकांकडून पैसे उकळले आहेत. असंख्य गुन्हे या टोळीच्या विविध सदस्यांवर मुंबईच्या विविध पोलिस ठाण्यात दाखल आहेत.

दाऊद हा टोळीचा म्होरक्या असून हवाला मार्फतही हे पैशांचा व्यवहार करतात. यातील इक्बाल कासकर हा एक मुख्य आरोपी असून ED ला तपासासाठी ७ दिवसांची कस्टडी मिळावी अशी ईडीच्या वकिलांनी विनंती केली. इक्बाल कासकर हा दाऊदचा भाऊ असल्यामुळेच त्याला टार्गेट केलं जात आहे. मात्र तरीही चौकशीत इक्बाल पूर्ण सहकार्य करेल असा, युक्तिवाग इक्बाल कासकरचे वकिल सुलतान खान यांनी केला.

इक्बालचे वकिल सुलतान खान यांनी इक्बाल हा अनेक आजारांनी त्रस्त असून कस्टडीत त्यांना वैद्यकिय औषध आणि घरचं जेवण देण्यात यावे अशीही मागणी केली, न्यायालयाने त्याला परवानगी दिली. आरोपीने कोणताही गुन्हा केलेला नाही म्हणून आरोपीने एक अर्ज केला की कस्टडीमध्ये असताना आरोपी कोणतेही गुन्हा स्विकरण्याबबात कोणतीही वक्तव्य करणार नाही.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT