Rahul Shewale/ Eknath Shinde News Saam TV
मुंबई/पुणे

'सेंट्रल व्हिस्टा'मध्ये बाळासाहेब ठाकरेंचे तैलचित्र लावा; खासदार राहुल शेवाळेंची मुख्यमंत्र्याकडे मागणी

मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेऊन महाराष्ट्राच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे ही मागणी करावी.

जयश्री मोरे

मुंबई: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या ज्वलंत विचारांची प्रेरणा भावी पिढ्यांना मिळत रहावी, यासाठी नव्याने उभारल्या जाणाऱ्या संसद भवनात, सेंट्रल व्हिस्टामध्ये (Central Vista) हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र लावण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी विनंती करणारे पत्र खासदार राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) या संदर्भात पुढाकार घेऊन महाराष्ट्राच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याकडे ही मागणी करावी, अशी विनंती खासदार शेवाळे यांनी मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली भेटी दरम्यान केली.

आपल्या पत्रात खासदार शेवाळे यांनी म्हटले आहे की, जागतिक दर्जाचे व्यंगचित्रकार, अन्यायाविरुद्ध परखड शब्दांत आपली भूमिका मांडणारे पत्रकार, अमोघ वकृत्त्वाने मराठी तरुणांमध्ये स्वाभिमान जागविणारे प्रभावी नेते अशा विविध भूमिका साकारणाऱ्या वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी एक नवा आदर्श देशासमोर मांडला आहे.

पाहा व्हिडीओ -

देशपातळीवरील एक प्रभावी नेता म्हणून त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे. वंदनीय बाळासाहेबांच्या ऐतिहासिक कारकीर्दीचा आदर राखत, त्यांच्या ज्वलंत विचारांची प्रेरणा भावी पिढ्यांना मिळत राहावी, यासाठी त्यांचे तैलचित्र नव्याने उभारण्यात येणाऱ्या संसद भवनाच्या ऐतिहसिक वास्तूत लावण्याची मागणी मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान यांच्याकडे करावी अशा मागणी शेवाळे यांनी केली आहे.

महाराष्ट्र सदनात उभारावा पूर्णाकृती पुतळा -

तसंच या आधी देखील शिवसेना हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा पूर्णाकृती पुतळा दिल्लीच्या महाराष्ट्र सदनाच्या आवारात उभारावा, अशीही मागणी खासदार राहुल शेवाळे यांनी जानेवारी महिन्यात मुख्यमंत्र्याकडे केली होती.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: फडणवीसांची शिष्टाई यशस्वी, भाजपचे बंडखोर प्रा. अनिल सोले यांची अखेर माघार

नायट्रोजन बॉम्बसारखी पसरली आग! मुंबईत १४ मजली इमारतीचा थरार; २ महिलांचा होरपळून मृत्यू, ४० जणांना वाचवले

Boat Accident: सरकारी नाव उलटून १३ चिमुकल्यांचा करुण अंत, पीएम मोदींकडून दुःख व्यक्त; ६ लाखांच्या मदतीची घोषणा

Wednesday Horoscope : मोठी संधी मिळेल; 5 राशींच्या व्यक्तींचे भाग्य उजळणार, वाचा बुधवारचे राशीभविष्य

बिहारमध्ये मोठी दुर्घटना! गंगा नदीत २० जणांना घेऊन जाणारी बोट उलटली; ११ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT