कोरोनाच्या काळात 'ती'चा प्रेरणादायी संघर्ष!  दिलीप कांबळे
मुंबई/पुणे

कोरोना काळात 'ती'चा प्रेरणादायी संघर्ष!

मावळ मधील ग्रामीण भागातील मिठाईची मागणी ओळखून अश्याच एका सावित्रीच्या लेकीने हातात झाऱ्या घेऊन रेवडी, जिलेबी, मैसूर पाक, बुंदी व बुंदीचे लाडू करायला सुरुवात केली अन संसाराला हातभार लावला.

दिलीप कांबळे

मावळ : कोरोना काळात अनेकांचे रोजगार गेले, हाताला काम नसल्याने अडचणी वाढल्या, याही परिस्थितीत काहींनी संधी शोधून संसाराचा गाडा नेटाने पुढे नेला. कोणी भाजीपाला विकायला सुरुवात केली कोणी वडापावची गाडी लावली कोणी चहाची टपरी लावली तर कोणी घरून जेवणाचे डबे पुरवायलाही सुरुवात केली. मावळ मधील ग्रामीण भागातील मिठाईची मागणी ओळखून अश्याच एका सावित्रीच्या लेकीने हातात झाऱ्या घेऊन रेवडी, जिलेबी, मैसूर पाक, बुंदी व बुंदीचे लाडू करायला सुरुवात केली अन संसाराला हातभार लावला.

भारती भोईरकर असे या महिला व्यवसायिकेचे नाव असून त्यांच्या कडे पाच एकर शेती आहे. मात्र, एक जुलै पासून पाऊस नव्हता, त्यामुळे दुबार पेरणी करण्याचे संकट ओढवले होते. तर आता मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि सर्व पीक वाहून गेले! पण न डगमगता आपण काहीतरी करावे म्हणून भारती यांनी मिठाईचे दुकान थाटले. मावळ मधील भोयरे गावात सर्व शेतकरी कुटुंब राहतात. येथे मिठाईला मागणी मिळू शकते व नव्या व्यवसायातून घरखर्च भागेल इतका नफा मिळू शकतो, हे ओळखून भारती यांनी मिठाईचा व्यवसार सुरु केला आणि त्यांचा अंदाज देखील खरा ठरला. भोयरे गावच्या पंचक्रोशीतील नागरिकांकडून भारती यांच्या दुकानातील मिठाईसाठी मोठी मागणी आहे. शेव पापडी, रेवडी, जिलेबी, बुंदीचे लाडू व बालुशाही यासारखे पदार्थ त्यांच्या दुकानात मिळतात.

पुरुषांची मक्तेदारी असलेल्या या व्यवसायात भारती यांनी पाय रोवले आणि संसाराला हातभार लावला आहे. दरम्यान यंदाच्या मुसळधार पावसाने शेतीचे मोठे नुकसान झाले. सरकार भरपाई देईल तेव्हा देईल पण आपणही व्यवसाय टाकला पाहिजे, हातात पैसे हवे तर हाताला काम मिळावे असा या सावित्रीच्या लेकीचे साधे गणित आहे. 

साम टीव्हीशी बोलताना भारती यांचे सासरे गौतम भोईरकर म्हणाले, मी पंचवीस वर्ष मुंबईला नोकरी निमित्ताने गेलो होतो. आमची शेती मुलगाच सांभाळत होता. मात्र शेती हि बेभरवशाची आहे. एक जुलै ला भाताची पेरणी केली मात्र पाऊसच आला नाही. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट ओढवले, आता पाऊस आला तर सर्व शेती पावसाने वाहून नेली. मात्र, माझ्या सुनेने मिठाईचे दुकान टाकून आमच्या कुटुंबाला हातभार लावला, याचा मला अभिमान आहे. 

कोरोना संकटाच्या काळात आर्थिक विवंचनेत असलेल्या ग्रामीण भागातील अनेक महिला आणि पुरुषांना भारती यांच्या या व्यवसायातून नक्कीच प्रेरणा मिळेल.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: परभणी शहरातील विविध भागात ATS पथकांची धाड

सोलापूर हादरले! प्रपोज नाकारल्याचा राग, महिलेच्या लग्नानंतर अवघ्या २ महिन्यांत पतीचा खून, कोयत्याने सपासप वार

Gold Rate Today : सोने खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! 24K, 22K, 18K सोन्याचे दर वाढले, पाहा आजचे भाव

Diabetes Recipe : मधुमेहाच्या रुग्णांनी 'ही' चटपटीत चटणी एकदा खाऊन तर पाहा, चवीला भारी अन् आरोग्याला फायदेशीर

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांची ₹51000 बेसिक सॅलरी होणार, आठव्या वेतन आयोगाची नवी मागणी आली समोर

SCROLL FOR NEXT