अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागांची सुनील शेळकें कडून पाहणी दिलीप कांबळे
मुंबई/पुणे

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागांची सुनील शेळकें कडून पाहणी

मावळ मध्ये अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने नागरिकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

दिलीप कांबळे, साम टीव्ही, पिंपरी-चिंचवड

मावळ : मावळ Maval मध्ये अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने नागरिकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. पावसामुळे Heavy Rain नुकसान झालेल्या लोणावळा Lonavla या ठिकाणी टाटा धरण, हुडको कॉलनी, डोंगरगाव Dongargaon या भागात आमदार MLA सुनिल शेळके Sunil Shelke यांनी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली आहे.

हे देखील पहा-

मुसळधार पाडणाऱ्या पावसामुळे इंद्रायणी नदीने Indrayani river धोक्याची पातळी ओलांडली असून, पावसाचे प्रमाण जर असेच राहिल्यास, दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील हुडको कॉलनीत पाणी शिरण्याची शक्यता आहे. यामुळे नागरिकांना वेळेत सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्याच्या सुचना ही यांनी प्रशासनाला administration दिल्या आहेत. नागरिकांनी देखील पाणी वाढण्याची वाट न पाहता प्रशासनाला सहकार्य करावे.

तत्काळ सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत व्हावे असे नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे. मावळ मधील डोंगरगाव, केवरे येथील वेताळनगर भागात घरांमध्ये देखील पाणी शिरले होते. या वस्तीवर सर्व लोकांना अंगणवाडीत तात्पुरते स्थलांतरीत करण्यात आले आहे. त्यांची आमदार शेळके यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला आणि येथील सर्व नागरिकांना योग्य सुविधा मिळतील, अश्या ठिकाणी स्थलांतरीत करण्याचे प्रशासनास सांगितले आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : चपलेचा प्रसाद देईल; राज ठाकरेंना धमकी देणाऱ्या भाजप खासदारावर रुपाली ठोंबरे भडकल्या

Investment Tips: फक्त १००० रूपयांची गुंतवणूक करा अन् लखपती व्हा, कसं ते जाणून घ्या?

Ind Vs Eng सामन्यानंतर आकाश दीपला अश्रू अनावर, कॅन्सरग्रस्त बहिणीला समर्पित केला विजय

'मराठी लोक कुणाची भाकर खातायेत?' निशिकांत दुबे मराठीविरोधात बरळले| पाहा VIDEO

Solapur Crime: नवऱ्याचं डोकं सटकलं; चार्जरच्या वायरने बायकोचा गळा आवळला, नंतर स्वत:लाही संपवलं

SCROLL FOR NEXT