माणूस कितीही मोठा असला तरी मेट्रो प्रवासाचा आग्रह ठेवा-  पंतप्रधान
माणूस कितीही मोठा असला तरी मेट्रो प्रवासाचा आग्रह ठेवा- पंतप्रधान  Saam Tv
मुंबई/पुणे

PM Modi visit to Pune: माणूस कितीही मोठा असला तरी मेट्रो प्रवासाचा आग्रह ठेवा- पंतप्रधान

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्राची कुलकर्णी

पुणे: पंतप्रधानांनी मराठीमध्ये भाषणाला सुरुवात केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले- सावित्रीबाई फुले, महर्षी कर्व्हे यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या पुण्यातील माझ्या बंधु-भगिणींना नमस्कार करतो. मी पुणेकरांना (Pune )आणि प्रबुद्ध लोकांना विनंती करतो की आपण कितीही मोठे झाले तरी मेट्रोमध्ये (Metro) प्रवास करा. ग्रीन ट्रान्सपोर्ट असावा ही आमची इच्छा आहे. पुण्याची ओळख ग्रीन फ्युअल मुळेही होते आहे. पुण्याला स्वच्छ आणि सुंदर बनवायला महापालिकेने काम सुरु केलंय. सारखा येणारा पूर थांबावयला आणि नदी स्वच्छतेसाठी हे प्रकल्प महत्वाचे आहे. शहरातल्या लोकांनी नदी उत्सव मनवला पाहीजे.

हे देखील पहा-

पुण्याच्या विकासात महत्त्वाच्या योगदान असणाऱ्या प्रकल्पाचे उद्घाटन, भूमिपूजन करण्याची संधी आज मिळाली. पुणे मेट्रोचे भूमिपूजनासाठी आणि उद्घाटन करण्याकरिता मला आमंत्रित करण्यात आले आहे. याकरिता पुणेकरांचा आभारी आहे. परंतु, प्रकल्प वेळेत पूर्ण होऊ शकतात, हे सिद्ध झाले आहे. येणाऱ्या काळामध्ये मेट्रो रेल्वेचे महत्त्व आणखी वाढणार आहे. देशभरात मेट्रोचे जाळं विस्तारत असून महाराष्ट्राचा मोठा वाटा असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी यावेळी सांगितले आहे. समाजातील सर्वच घटकांनी मेट्रोचा वापर करण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले आहे.

मेट्रोतून प्रवास करणे पुणे शहरात एक प्रकारे मदत करण्यासारखे आहे. २१ व्या शतकामध्ये शहरांच्या गरजा आणि विकास लक्षात घेऊन सरकार धोरण आखत आहे. सरकार अधिकाधिक ई- वाहनांच्या वापराकरिता प्रोत्साहन देत आहे. अत्याधुनिक पद्धतीने घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी प्रक्रियेची व्यवस्था, बायोगॅस प्लांट, स्मार्ट एलईडी बल्बचा या गोष्टींचा वापर अधिक व्हावा यासाठीच्या धोरणांवर सरकारकडून काम सुरू असल्याचे पंतप्रधानांनी आपल्या भाषणात नमूद केले. मुळा- मुठा नदी प्रकल्पांच्या पुनरुज्जीवन आणि प्रदूषण निवारणाची पायाभरणीचे काम देखील पंतप्रधान मोदींच्या हस्ते करण्यात आली. नदीच्या ९ किमी पट्ट्यामध्ये १०८० कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च करून पुनरुज्जीवन करण्यात येणार आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuljabhavani Mandir : तुळजाभवानी मंदिरात सुरक्षा रक्षकाकडून महिला भाविकास धक्काबुक्की

Mumbai Indians Playing XI: हैदराबादविरुद्ध अर्जुन तेंडुलकरला संधी मिळणार? पाहा कशी असेल मुंबईची प्लेइंग ११

Solo Travel Tips: एकट्याने फिरायला जाण्याची आवड आहे;मग 'या' गोष्टी ठेवा लक्षात

Baramati Constituency: हे चार विधानसभा मतदारसंघ संवेदनशील जाहीर करा; राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाची मागणी

Nashik Loksabha: मनधरणी निष्फळ! शांतीगिरी महाराज अपक्ष लढण्यावर ठाम; नाशिकमध्ये महायुतीची वाट बिकट?

SCROLL FOR NEXT