PNG-CNG Price Hike Saam Tv
मुंबई/पुणे

PNG-CNG Price Hike: महागाईचा स्फोट! CNG तिसऱ्यांदा महागला, PNG प्रति किलो 51.50 रुपयांवर

Pune CNG price hike latest update: सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री लागली आहे. पीएनजी आणि सीएनजीच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे.

Priya More
  • सर्वसामान्य नागरिकांना मोठा झटका

  • सीएनजीच्या दरात तिसऱ्यांदा वाढ

  • सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री

  • सीएनजीच्या दरात प्रति किलो 1 रुपया वाढ झाली

  • घरगुती पीएनजीच्या दरात 85 पैशांची वाढ झाली

आखाती युद्ध थांबलं आणि जागतिक बाजारात तेलाचे भाव कमी झाले. मात्र, सीएनजीच्या दरात तिसऱ्यांदा वाढ झाल्यानं सामान्य नागरिक चांगलेच आक्रमक झालेत. या दरवाढीविरोधात पुणेकर रस्त्यावर उतरणार का? पाहूयात यावरचा हा रिपोर्ट...

आखातातील युद्ध थांबलं असलं तरी सर्वसामान्यांना बसणारी महागाईची झळ अद्याप कायम आहे. युद्ध थांबल्यानंतर जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दरही घसरले. मात्र दुसरीकडे केंद्र सरकारनं सीएनजी आणि पीएनजीच्या दरात मोठी वाढ केलीये. सीएनजीच्या दरात प्रति किलो 1 रुपया, तर घरगुती पीएनजीच्या दरात 85 पैशांची वाढ झालीये. त्यात पुण्यात तिसऱ्यांदा सीएनजीचे दर वाढल्यानं पुणेकरांनी संताप व्यक्त केलाय.

वाहनांसाठी स्वस्त इंधनाचा पर्याय म्हणून सीएनजीचा वापर केला जातो. मात्र सीएनजीच्या किमतीत दीड महिन्यांत तिसऱ्यांदा वाढ कशी झाली. पाहूयात...

सीएनजी आता 95.75 रुपयांवर

8 मे रोजी सीएनजीच्या दरात अडीच रुपयांची वाढ होऊन सीएनजी 93 रुपये 25 पैसे इतकं झालं. त्यानंतर

28 मे रोजी सीएनजीच्या किंमतीत दीड रुपयांनी वाढ झाली... आणि सीएनजी 94 रुपये 75 पैसे इतकं झालं...

त्यानंतर आता 16 जूनला सीएनजीच्या दरात 1 रुपयांनी वाढ होऊन सीएनजीसाठी 95 रुपये 75 पैसे मोजावे लागणार आहेत.

पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतीला कंटाळून लाखो वाहनधारकांनी सीएनजी गाड्यांचा पर्याय निवडला. मात्र, आता सीएनजीच्या दरही शंभरीच्या उंबरठ्यावर पोहचले आहेत. त्यामुळे वाहनचालक हवालदिल झाले आहेत. मात्र आखातातील युद्ध थांबूनही नेमकी दरवाढ कशामुळे होतेय असा प्रश्न आता सामान्य जनतेला पडलाय? हा महागाईचा आगडोंब कधी शमणार याचीच प्रतिक्षा सर्वांना आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT