indrayani river polluted saam tv
मुंबई/पुणे

Indrayani River Polluted : इंद्रायणी नदी जलपर्णीच्या विळख्यात, बीज सोहळा येऊन ठेपला तरीही प्रशासन ढिम्म

उन्हाळ्यात बाष्पीभवन होऊन पात्रातील पाणीसाठ्यात घट होत असताना यामध्ये मोठ्या प्रमाणात सांडपाणी मिसळत आहे. त्यामुळे इंद्रायणी नदीचे पात्र दूषित झाले आहे.

दिलीप कांबळे

Maval :

अवघ्या काही दिवसांवर जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा बीज सोहळा (sant tukaram maharaj beej sohala) येऊन ठेपला आहे. त्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक देहूनगरीत (dehu) दाखल होतात. पवित्र इंद्रायणी नदीचे पाणी तीर्थ म्हणून प्राशन करत असतात. पण याच पवित्र समजल्या जाणाऱ्या इंद्रायणी नदीची (indrayani river) दुरवस्था झाली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

इंद्रायणी नदी ही पवित्र समजली जाणारी आणि लाखो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान आहे. या नदीपात्रात सांडपाणी मिसळत असल्याने मोठ्या प्रमाणात प्रदूषण होऊन पात्रात मोठ्या प्रमाणात जलपर्णीने विळखा घातला आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी सुटली आहे. गेल्या काही दिवसांपासून मृत माशांची संख्या वाढत असतानाही नगरपंचायत प्रशासनाने पावले न उचलल्याने पर्यावरण प्रेमींनी नाराजी व्यक्त करु लागले आहेत.

उन्हाळ्यात बाष्पीभवन होऊन पात्रातील पाणीसाठ्यात घट होत असताना यामध्ये मोठ्या प्रमाणात सांडपाणी मिसळत आहे. त्यामुळे इंद्रायणी नदीचे पात्र दूषित झाले असून पाण्याला उग्र घाण वास येऊ लागला आहे. (Maharashtra News)

पाण्यावर जलपर्णीचा वेढा पडल्याने अपुऱ्या ऑक्सिजन मुळे मासे मृत होत असल्याची शक्यता आहे. हे सांडपाणी मिश्रित पाणी बीज सोहळ्यावेळी लाखो वारकरी तीर्थ म्हणून प्राशन करत असतात. त्यामुळे येणाऱ्या भाविकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

देहूतील इंद्रायणी नदीतील जलपर्णी काढण्याचे काम नगरपरिषदेकडून सुरू करण्यात आले आहे. तर एसटीपी प्लांटच्या माध्यमातून पाण्यावर प्रक्रिया करूनच पाणी इंद्रायणी नदीच्या डोहात सोडलं जाण्याचा दावा केला जात आहे.

दुसरीकडे देहूतील काही धर्मशाळा यांचे सांडपाणी इंद्रायणी नदीत जात असल्याने अश्या धर्म शाळांना नगरपंचायतीकडून नोटिसा बजावण्यात आल्याचे देहू नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी निवेदिता घार्गे यांनी सांगितले आहे.

आगामी काळात बीज सोहळा आहे. ताेपर्यंत तरी उपाययोजना प्रशासनाकडून करण्यात येणार का असा सवाल भाविक करू लागले आहेत. इंद्रायणी नदीवर जलपर्णीचा हिरवा गालीछा अंधरण्यासारखी परिस्थिती या नदीची झाली आहे. फक्त या नदी पात्रात क्रिकेटचे सामन्यांचे आयाेजन करण्याचे राहिले आहे असेही भाविक म्हणू लागले आहेत.

राज्य सरकार कोटींचा निधी इंद्रायणी नदीच्या संवर्धनासाठी देतात मात्र हा निधी कुठं अदृश्य होतो त्याचं रहस्य देहूंकरांना पडलं आहे. त्यामुळे किमान राज्य सरकारने याबाबत गंभीरपणे विचार करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. देहूतील हजारो नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न नव्हे तर बीज निमित्ताने लाखो भाविक देहूत दाखल होतात. त्या सर्व वारकरी भाविक भक्तांचे आरोग्य धोक्यात येणार आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT