Eknath shinde Saam Tv
मुंबई/पुणे

Indore-Pune Bus Accident: समोरुन येणाऱ्या दुचाकीला वाचवताना बसचा अपघात; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती

इंदूरमध्ये बसचा झालेला अपघात हा समोरुन येणाऱ्या दुचाकीला वाचवताना झाला आहे.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई: इंदूरमध्ये बसचा झालेला अपघात (Accident) हा समोरुन येणाऱ्या दुचाकीला वाचवताना झाला आहे. मृतांच्या नातेवाईकांना राज्यशासनाकडून १० लाख रुपयांचा निधी जाहीर केला आहे. मी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याशी बोललो आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली.

मध्यप्रदेशमध्ये बस नदीत कोसळली. पण या बसचा अपघात (Accident) नेमक्या कोणत्या कारणामुळे झाला हे अजुनही समोर आले नव्हते. पण आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा अपघात कसा झाला याचे कारण सांगितले आहे. समोरुन येत असलेल्या दुचाकीला वाचवत असताना बस नदीत कोसळली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.

मध्य प्रदेशात नर्मदा नदीमध्ये आज एसटी महामंडळाची बस बुडून झालेल्या अपघातात मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे प्रत्येकी दहा लाख रुपये देण्याची कार्यवाही लगेच करावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी एस टी महामंडळाला दिले आहेत. या अपघातात मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मुख्यमंत्र्यांच्या जळगाव जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

मध्य प्रदेशात नर्मदा नदीमध्ये आज सकाळी एसटी महामंडळाची बस कोसळून झालेल्या अपघाताबद्धल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले असून, बचाव कार्य व्यवस्थित पार पाडावे व जखमींवर लगेच उपचारासाठी मध्य प्रदेश मधील जिल्हा प्रशासनाशी योग्य समन्वय ठेवावा असे निर्देश जळगाव जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. अपघाताचे वृत्त कळताच मुख्यमंत्र्यांनी तातडीने मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चव्हाण यांच्याशी देखील बोलून मध्यप्रदेश मधील खरगोन व धार जिल्हा प्रशासनाला अपघातग्रस्त व्यक्तींना आवश्यक ते सहकार्य करण्याचे नियोजन करण्याची विनंती केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी या दुर्घटनसंदर्भात मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव तसेच एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांना देखील सूचना दिल्या. बचावलेल्या प्रवाशांना तातडीने आवश्यक ती सर्व मदत करण्याचे निर्देश दिले आहेत. मृतदेह बाहेर काढून योग्य प्रक्रियेनंतर त्यांच्या नातेवाईकांना ताब्यात देण्यासंदर्भातही मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या. मुख्यमंत्री स्वतः मदत कार्यावर लक्ष ठेऊन आहेत.

जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाने या अपघातासंदर्भात एक नियंत्रण कक्ष स्थापन केल्याची, माहिती देखील जळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना दिली आहे. या नियंत्रण कक्षाचा क्रमांक ०२५७२२२३१८० आणि ०२५७२२१७१९३ असा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: सराफा बाजार उघडताच सोन्याच्या दरात मोठा बदल; २४k, २२k, १८k सोन्याची प्रति तोळा किती किंमत? वाचा ताजे दर

IPL 2026: 1...2...3 नाही तर तब्बल 11 चेंडू; अर्शदीप सिंगने हद्दच केली, फेकली सर्वात मोठी ओव्हर

Dhurandhar 2 Box Office: बॉक्स ऑफिसवर रणवीर सिंहचा जलवा; 'धुरंधर २' ची १३ दिवसात १५०० कल्बमध्ये एन्ट्री

Maharashtra Live News Update: अशोक खरातच्या मुलाची काल रात्री चौकशी

Crime News: घरात पतीचा मृतदेह दिसताच पत्नीनं १७ मजल्यावरून मारली उडी; इंजिनिअर जोडप्याच्या मृत्यूनं परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT