Indore-Pune Bus Accident: मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे १० लाख; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आदेश

आज सकाळी मध्य प्रदेशच्या धारमध्ये महाराष्टातील बसला मोठा अपघात (Accident) झाल्याची बातमी सोमर आली.
Indore-Pune Bus Accident
Indore-Pune Bus AccidentSaam Tv
Published On

मुंबई: आज सकाळी मध्य प्रदेशच्या धारमध्ये महाराष्टातील बसला मोठा अपघात (Accident) झाल्याची बातमी सोमर आली. इंदूरहून पुण्याकडे येणारी बस नदीत कोसळली. या दुर्घटनेत आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर १५ जणांना वाचवण्यात यश आले आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या अपघातात मृतांच्या नातेवाईकांना आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मदत जाहीर केली आहे.

मध्य प्रदेशात नर्मदा नदीमध्ये आज एसटी महामंडळाची बस बुडून झालेल्या अपघातात मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे प्रत्येकी दहा लाख रुपये देण्याची कार्यवाही लगेच करावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी एस टी महामंडळाला दिले आहेत. या अपघातात मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Indore-Pune Bus Accident
Indore-Pune Bus Accident: इंदूर-पुणे बसला अपघातावेळी नेमके काय घडले?

मुख्यमंत्र्यांच्या जळगाव जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

मध्य प्रदेशात नर्मदा नदीमध्ये आज सकाळी एसटी महामंडळाची बस कोसळून झालेल्या अपघाताबद्धल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले असून, बचाव कार्य व्यवस्थित पार पाडावे व जखमींवर लगेच उपचारासाठी मध्य प्रदेश मधील जिल्हा प्रशासनाशी योग्य समन्वय ठेवावा असे निर्देश जळगाव जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. अपघाताचे वृत्त कळताच मुख्यमंत्र्यांनी तातडीने मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चव्हाण यांच्याशी देखील बोलून मध्यप्रदेश मधील खरगोन व धार जिल्हा प्रशासनाला अपघातग्रस्त व्यक्तींना आवश्यक ते सहकार्य करण्याचे नियोजन करण्याची विनंती केली आहे.

Indore-Pune Bus Accident
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सत्कार समारंभात महापुरुषांचा अपमान; अमोल मिटकरींची टीका

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी या दुर्घटनसंदर्भात मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव तसेच एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांना देखील सूचना दिल्या. बचावलेल्या प्रवाशांना तातडीने आवश्यक ती सर्व मदत करण्याचे निर्देश दिले आहेत. मृतदेह बाहेर काढून योग्य प्रक्रियेनंतर त्यांच्या नातेवाईकांना ताब्यात देण्यासंदर्भातही मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या. मुख्यमंत्री स्वतः मदत कार्यावर लक्ष ठेऊन आहेत.

जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाने या अपघातासंदर्भात एक नियंत्रण कक्ष स्थापन केल्याची, माहिती देखील जळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना दिली आहे. या नियंत्रण कक्षाचा क्रमांक ०२५७२२२३१८० आणि ०२५७२२१७१९३ असा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com