Indian Railway Railone App News AI
मुंबई/पुणे

Railway News : ‘रेलवन’ अ‍ॅपमध्ये तांत्रिक त्रुटी, प्रवासी टीसीला पाहून चालू ट्रेनमध्ये काढतायत तिकीट; काय आहे नेमकं प्रकरण?

Railone App News : भारतीय रेल्वेच्या ‘रेलवन’ अ‍ॅपमध्ये तांत्रिक त्रुटी समोर आली असून जिओ-फेन्सिंग असूनही प्रवासी चालू ट्रेनमध्ये तिकीट बुक करू शकत आहेत. या प्रकरणी रेल्वे प्रशासनाने तपास सुरू केला आहे.

Alisha Khedekar

  • रेलवन अ‍ॅपमध्ये तांत्रिक त्रुटी उघड

  • चालू ट्रेनमध्ये तिकीट बुकिंग शक्य

  • यूटीएस अ‍ॅपनंतरही समस्या कायम

  • टीसीच्या तपासात प्रकार उघडकीस

  • रेल्वे प्रशासनाकडून तपास आणि सुधारणा सुरू

मयूर राणे, मुंबई

AI तंत्रज्ञाचा वापर करून प्रवाशांनी बऱ्याचवेळा बनावट तिकीट तयार केल्याचा प्रकार उघड झाल्यानंतर, या गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी भारतीय रेल्वेने 'रेलवन' नावाचे अत्याधुनिक अ‍ॅप लाँच केले. मात्र आता या 'रेलवन' तिकीट बुकिंग अ‍ॅपमध्ये तांत्रिक त्रुटी आढळून आल्या आहेत. रेलवनमध्ये जिओ-फेन्सिंग प्रणाली असूनही प्रवासी चालू ट्रेनमध्ये असतानाच तिकीट बुक करू शकत असल्याचे समोर आले आहे.

रेल्वे बोर्डाने 'यूटीएस' अ‍ॅपमधील क्यूआर कोडवर आधारित तिकीट प्रणालीचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर झाल्याने ती बंद केली होती. आता त्याच्या पर्यायात आलेल्या रेलवन अ‍ॅपमध्येही अशाच प्रकारची उणीव समोर आली आहे. कल्याणकडे जाणाऱ्या एसी लोकलमध्ये नियमित तिकीट तपासणीदरम्यान एका प्रवाशाने प्रवास सुरू असताना तिकीट काढल्याचे टीसीच्या निदर्शनास आले.

त्यावेळी तिकीट काढल्याची वेळ तपासल्यावर ते नुकतेच काढल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे याबाबत टीसीने वाणिज्य विभागाला कळवले. याबाबत मध्य रेल्वेने 'क्रिस'ला (सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टीम्स) पत्र दिले असून या त्रुटी दूर करण्याचे सूचित केले आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, जुने 'यूटीएस' अ‍ॅप १ मार्चपासून बंद करून रेलवन अ‍ॅप सुरू केल्यावर अशा अनेक घटना समोर आल्या. मात्र पहिली अधिकृत नोंद ६ मार्च रोजी झाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पाऊस गायब, पण छत्रीसाठी तुफान गर्दी! भाजप नेत्याच्या उपक्रमाची जोरदार चर्चा; खासगी सुरक्षारक्षक तैनात

Russia-Ukraine War: युक्रेनचा रशियावर मोठा हवाई हल्ला; क्षेपणास्त्र कारखाना उद्धवस्त

खड्डेमुक्त रस्त्यांची मंत्र्यांकडूनच पोलखोल, गुजरातपेक्षा महाराष्ट्रातील रस्ते खराब'

Nashik Firing: नाशिकमध्ये गोळीबाराने खळबळ! पानटपरीसमोर उभ्या असलेल्या तरुणावर फायरिंग

जेन झी'चे अनेक बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंड्स, बाबा रामदेव पुन्हा बरळले

SCROLL FOR NEXT