Kalyan News Saam Tv
मुंबई/पुणे

Kalyan News: कल्याणमध्ये गुढीपाडव्यानिमित्त हिंदू नववर्ष स्वागतयात्रेचे यंदा रौप्य महोत्सव, इंडीयन मेडीकल असोसिएशन करणार आयोजन

Gudi Padwa 2024: कल्याणात गुढीपाडव्यानिमित्त काढण्यात येणाऱ्या हिंदू नववर्ष स्वागतयात्रेचे यंदा रौप्य महोत्सवी 25 वे वर्ष असून इंडीयन मेडीकल असोसिएशन कल्याणकडे आयोजनपद देण्यात आले आहे.

साम टिव्ही ब्युरो

>> अभिजित देशमुख, कल्याण

Kalyan News:

कल्याणात गुढीपाडव्यानिमित्त काढण्यात येणाऱ्या हिंदू नववर्ष स्वागतयात्रेचे यंदा रौप्य महोत्सवी 25 वे वर्ष असून इंडीयन मेडीकल असोसिएशन कल्याणकडे आयोजनपद देण्यात आले आहे. "जयघोष हिंदुत्वाचा - जल्लोष कल्याणकरांचा" या ब्रीद वाक्याखाली ही स्वागतयात्रा काढण्यात येणार आहे. या स्वागत यात्रेत 25 हजार नागरिक सहभागी होतील, असा विश्वास आयोजक इंडीयन मेडीकल असोसिएशनच्या डॉ. प्रशांत पाटील यांनी व्यक्त केला आहे.

या रौप्य महोत्सवी हिंदू नववर्ष स्वागतयात्रेमध्ये कल्याणकरांचा सहभाग वाढविण्यासाठी आयएमए कल्याणकडून गेले वर्षभरापासून विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. यंदाच्या रौप्य महोत्सवी हिंदू नववर्ष स्वागतयात्रेच्या कार्यक्रमांची सुरुवात ६ एप्रिलपासून केली जाणार आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

६ एप्रिल रोजी कल्याणच्या ऐतिहासिक भगवा तलाव येथील श्रीराम मंदिरात प्रभू श्रीरामांची आरती सोहळा, ७ एप्रिल रोजी कल्याण पश्चिमेत ठिकठिकाणी स्वच्छता अभियान, ८ एप्रिल रोजी वासुदेव बळवंत फडके मैदानात सांगितिक कार्यक्रम होणार असून महाराष्ट्राच्या कलाविश्वात नावलौकिक मिळवलेल्या कल्याणातील गायक नचिकेत लेले, डॉ. संकेत भोसले, कोरिओग्राफर आशिष पाटील, कलाकार आदिती सारंगधर हे युवा कलाकार त्यात सहभागी होणार असल्याची माहिती स्वागतयात्रेचे समन्वयक आयएमएचे डॉ. प्रशांत पाटील यांनी दिली. तर रौप्य महोत्सवी हिंदू नववर्ष स्वागतयात्रेनिमित्त फडके मैदानात २५ फुटांची भव्य गुढीही उभारण्यात येणार आहे. (Latest Marathi News)

"जयघोष हिंदुत्वाचा - जल्लोष कल्याणकरांचा" या ब्रीद वाक्याखाली ही स्वागतयात्रा काढण्यात येईल. ही रौप्य महोत्सवी हिंदू नववर्ष स्वागतयात्रा असल्याने त्यामध्ये कल्याणातील प्रत्येक नागरिक आणि प्रत्येक सामाजिक संस्थेला सहभागी करून घेण्यात आले आहे. त्यामुळे यामध्ये मराठी बांधवांसोबत गुजराथी, मारवाडी, पंजाबी, उत्तर भारतीय, दक्षिण भारतीय अशा सर्वच प्रांतातील समाज बांधव पारंपरिक स्वरूपात सहभाग घेणार आहेत.

मुख्य स्वागतयात्रा ही नेहमीप्रमाणे मुरबाड रोड येथून सकाळी ६.३० वाजता निघून कमिश्नर बंगला, रामबाग, सहजानंद चौक, छ्त्रपती शिवाजी महाराज चौक, केडीएमसी, देवी अहिल्याबाई चौक, लोकमान्य टिळक चौक, पारनाका, लालचौकीमार्गे वासुदेव बळवंत फडके मैदानात पोहोचेल. तर नविन कल्याण अशी ओळख असणाऱ्या साईचौक खडकपाडा आणि स्व. विशाल भोईर चौक उंबर्डे परिसरातून दोन नव्या उपयात्रा फडके मैदानात पारंपरिक यात्रेमध्ये जोडल्या जाणार असल्याचेही डॉ. प्रशांत पाटील यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jasprit Bumrah: लॉर्ड्सच्या मैदानावर जसप्रीत बुमराहचा 'पंचबळी'; ऑनर बोर्डवर कोरलं जाणार नाव!

Maharashtra Live News Update : बदनामी थांबवा! पडळकर एफ सी रोड वर या

Nagpur News: नागपूरच्या पबमध्ये टेबलच्या वादातून राडा; तरुणाला बेदम मारहाण | VIDEO

India vs England 3rd Test Day 2 scorecard update : जसप्रीत बुमराहचा जबरा 'पंच'; इंग्लंडचा दुसऱ्या दिवशी धुव्वा, ३८७ धावांवर गारद

Ind Vs Eng : शुभमन गिल थेट अंपायर्संना भिडला, एका चेंडूवरुन मोठा राडा; लॉर्ड्सच्या मैदानात काय घडलं?

SCROLL FOR NEXT