भारत-पाकिस्तानमधील तणाव वाढत चालला आहे. सीमा भागात पाकिस्तान भारताच्या दिशेने वारंवार ड्रोन आणि मिसाईल हल्ले करत आहे. भारत देखील पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देत आहे. दोन्ही देशातील तणावाच्या पार्श्वभूमीर देशात अलर्ट जारी करण्यात आला आहे. सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. मुंबई एअरपोर्टजवळ काही तासांपूर्वी ड्रोन फिरत असल्याची बातमी समोर आली होती. अशातच आता मुंबईतल्या टाटा रुग्णालयाला धमकीचा मेल आला आहे. त्यामुळे खळबळ उडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, परेलमधील टाटा रुग्णालयाला धमकीचा मेल आला आहे. त्यामुळे सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. टाटा मेमोरियल रुग्णालयाला धमकीचा मेल आल्याने एकच खळबळ उडाली आहे. धमकीच्या मेलनंतर पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे. संपूर्ण रुग्णालयात सर्च ऑपरेशन राबविण्यात आलं. बॉम्बशोधक पथक टाटा मेमोरियल रुग्णालयात दाखल झाले आहे. ज्या मेलवरून ही धमकी आली आहे त्याचा आयपी ॲड्रेस शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
तर, भारत- पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमिवर मुंबईतील मच्छिमारांसोबत नौदलाची महत्वाची बैठक झाली. नौदल ठिकाणं संवेदनशील ठिकाणी मच्छिमरांना मच्छिमारीसाठी न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या. नौदलाने आखून दिलेल्या परिसरात आल्यास 'शूट टू किल'च्या सूचना देण्यात आल्या आहेत.
लवकरच मुंबईतील मच्छिमार बोटींचं सर्वेक्षण करून एका अॅपच्या मदतीने त्यांचा डाटा गोळा केला जाणार आहेत. पकिस्तानकडून गुजराती मच्छिमारांच्या काही बोटी ताब्यात घेतल्या असून मच्छिमारांना सोडून बोटी जप्त केल्याची सूत्रांनी माहिती दिली. २६/११ प्रमाणे या बोटींचा वापर पाकिस्तानकडून केला जाण्याची शक्यता असल्याने नेव्हीकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.