पहिली सेवा मुंबईत सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
ही पॉड टॅक्सी ठाणे, नवी मुंबई आणि मीरा-भाईंदरला जोडणार आहे.
या टॅक्सीमुळे ट्रॉफिकपासून सुटका होईल.
भारतातील शहरं गतिशील वेगाने एका नवीन युगात प्रवेश करत आहेत. अत्याधुनिक एक्सप्रेसवेपासून ते इलेक्ट्रिक बसेसपर्यंत आणि वंदे भारत ते नमो भारत गाड्यांपर्यंत, हे सर्व भारत प्रगतीपथावर असल्याचं दाखवणारे उदाहरणं आहेत. यातील सर्वात मोठा प्रकल्प मुंबई ते अहमदाबाद दरम्यान बुलेट ट्रेनचा प्रकल्प आहे, हा प्रकल्प पू्र्ण होण्याच्या मार्गावर आहे. त्यानंतर आता मुंबईत दुसरा मोठा पॉड टॅक्सीचा प्रकल्पला मंजुरी देण्यात आलीय.
महाराष्ट्रात भारतातील पहिलं पॉड टॅक्सी नेटवर्क सुरू करण्यात येत आहे. ही पॉड टॅक्सी ठाणे, नवी मुंबई आणि मीरा-भाईंदरला जोडली जाणार. महाराष्ट्र सरकारने मंजूर केलेला हा प्रकल्प मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) द्वारे विकसित केला जाईल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पॉड टॅक्सी नेटवर्कसाठी मंजुरी देण्यात आलीय.
पुणे मिररच्या वृत्तानुसार,हा प्रकल्प सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) मॉडेल अंतर्गत सुरू केला जाईल. यामध्ये खासगी कंपन्यांना तांत्रिक कौशल्य आणि आर्थिक प्रस्ताव देण्यासाठी आमंत्रित केले जाणार आहे. पॉड टॅक्सी ही चालकविरहित, स्वयंचलित मागणीनुसार वाहतूक व्यवस्था आहे. ज्याला वैयक्तिक जलद वाहतूक (PRT) असेही म्हणतात. पॉड टॅक्सी लहान असतात, यातून ३-६ प्रवासी वाहून नेता येतात. त्या उंच ट्रॅकवर (एलिवेटेड) चालतात. या टॅक्सीमुळे ट्रॉफिकपासून सुटका तर मिळेलच पण त्याचबरोबर बराच वेळही वाचणार आहे.
सध्या अबू धाबी, लंडन, दक्षिण कोरिया आणि जपानच्या काही भागात पॉड टॅक्सी कार्यरत आहे. आता भारतातही ही टॅक्सी सेवा सुरू केली जाणार आहे. या टॅक्सी भारतातील सोयीनुसार कस्टमाइझ केल्या जाणार आहेत. एमएमआरडीएला कॉरिडॉरचे नकाशे तयार करण्यासाठी, वाहतुकीचा अभ्यास करण्यासाठी आणि दैनंदिन प्रवाशांना जास्तीत जास्त फायदा देणाऱ्या पॉड मार्गांना अंतिम रूप देण्यासाठी महापालिका संस्थांसोबत काम करण्यास सांगण्यात आले आहे. महाराष्ट्रात, पॉड टॅक्सी बस आणि मेट्रो स्थानकांसह मोनोरेल आणि रेल्वे स्थानकांशी जोडल्या जातील, ज्यामुळे प्रवाशांना एका वाहतुकीच्या पद्धतीवरून दुसऱ्या वाहतुकीत सहजपणे स्विच करता येईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.