India Aghadi Mumbai Meeting: मुंबईत आजपासून पुढील दोन दिवस विरोधकांच्या इंडिया आघाडीची महत्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीला देशभरातून विरोध पक्षांचे नेते येणार आहे. या नेत्यांच्या स्वागताची जबाबदारी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडे देण्यात आली आहे. मुंबईच्या ग्रॅण्ड हयात हॉटेलबाहेर मराठमोळ्या पद्धतीने सर्व नेते मंडळींचे स्वागत केले जाणार आहे. (Latest Marathi News)
त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांच्याकडून इंडिया आघाडीच्या (India Aghadi) नेत्यांसाठी खास डिनरचं आयोजन देखील करण्यात आलं आहे. डिनरमध्ये नेत्यांसाठी खास महाराष्ट्रीयन मेन्यू ठेवण्यात आला आहे. सायंकाळी ६ वाजेपर्यंत सर्व महत्त्वाचे नेते ग्रँड हयात मध्ये उपस्थित राहतील. या नेत्यांच्या स्वागतासाठी पार्लेश्वर ढोल पथक तसेच मुलींच्या लेझीम पथकाने तयारी केली आहे.
साडेसहा वाजता इंडिया आघाडीच्या लोगोचं अनावरण होईल. तर ८ वाजता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडून सर्व नेत्यांसाठी डिनरचं आयोजन करण्यात आलं आहे. नाष्ट्यासाठी बाकरवडी, नारळाची वडी, फळांचा ज्यूस असणार आहे. याशिवाय दुपारच्या जेवणात झुणका-भाकर, काळ्या वाटाण्याची मिसळ, डाळिंबाची उसळ, मिरचीचा ठेचा आणि मसाले भात असणार आहे.
दरम्यान, या बैठकीआधी इंडिया आघाडीची ताकद आणखी वाढली आहे. कारण इंडिया आघाडीत सहभागी झालेल्या राजकीय पक्षांची संख्या आता २८ इतकी झाली आहे. महाराष्ट्रातील डाव पीडब्लूपी(PWP) आणि आणखी एक प्रादेशिक पक्ष इंडियामध्ये सामील झाले आहेत. काँग्रेस प्रदेशाध्य नाना पटोले यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
दरम्यान, दोन दिवस चालणाऱ्या या बैठकीत निवडणुकीची रणनीती, जागावाटपाचा फॉर्म्युला, लोगो आणि किमान समान कार्यक्रम यावर या बैठकीत चर्चा होणार आहे. दरम्यान इंडिया आघाडीच्या निमंत्रक व समन्वय समितीच्या सदस्यांबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. यावरही या बैठकीत चर्चा होऊ शकते, अशी माहिती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी दिली.
Edited by - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.