अक्षय बडवे
Pune News: गेल्या काही महिन्यांपासून देशासह राज्यात अनेक ठिकाणी धार्मिक तेढ निर्माण करून दंगली घडवायचे प्रयत्न झाले. असं असलं तरी देशातील विविध धर्मीय एकोपा हा टिकवून आहेत. या एकोप्याची अनेक सुंदर उदाहरणे आहेत. असंच देशाप्रती असलेलं प्रेम आणि सामाजिक संदेश देत पुण्यातील शेख कुटुंबीय गेल्या ५० वर्षांपासून तिरंगा बनवतायत. (Latest Marathi News)
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील बाजारपेठा सज्ज आहेत. तिरंगा खरेदी करण्यासाठी नागरिक सध्या गर्दी करताना दिसतायत. गेल्या ५० वर्षांपासून पुण्यातील शेख कुटुंब तिरंगा बनवण्याचे काम करत आहे. सध्या शेख कुटुंबाची चौथी पिढी देशाचा तिरंगा बनवण्याचं काम करतेय. शेख कुटुंबियांकडून बनविण्यात आलेले हे झेंडे शहरातील अनेक विक्रेत्यांकडे पुरवले जातात.
मोहम्मद शरीफ शेख यांनी 50 वर्षाहून अधिक काळापासून झेंडे बनविण्याचा व्यवसाय सुरू केला. पाहता पाहता झेंडा बनविण्याचे काम आज त्यांच्या चौथ्या पिढीपर्यंत पोहचले आहे. शेख कुटुंबातील सर्वच जण तिरंगा बनवण्याचे काम करतात.
कोणी काही म्हणू किंवा काही असो हे काम करायला आम्हाला अभिमान वाटतो. शिवाय हे काम आम्ही व्यवसाय म्हणून नव्हे तर देशसेवा म्हणून करतो. मला या घराची सून होऊन 3 ते 4 वर्ष झाली आहेत. पण मी देखील घरच्यांचे बघून बघून शिकत गेले आणि आज अभिमानाने तिरंगा बनवतेय असं याच कुटुंबातील ऐमन शेख सांगतेय.
सध्या महागाई वाढल्याने सर्वच गोष्टी या महाग झाल्या आहेत. पण असं असलं तरी सुद्धा झेंडा बनवताना देशाचा अभिमान वाटतो आणि आम्ही देखील एक देशसेवा करतो अशी भावना यावेळी शेक कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.