महाराष्ट्र ATSने अटक केलेल्या दोन संशयित दहशतवाद्यांच्या कोठडीत वाढ  Saam TV
मुंबई/पुणे

महाराष्ट्र ATSने अटक केलेल्या दोन संशयित दहशतवाद्यांच्या कोठडीत वाढ

महाराष्ट्र एटीएसने अटक केलेल्या दोन संशयित दहशतवाद्यांच्या कोठडीत वाढ झाली आहे. न्यायालयाने दोन्ही आरोपींना 4 नोव्हेंबरपर्यंत महाराष्ट्र एटीएसकडे कोठडी दिली आहे.

सुरज सावंत

मुंबई: महाराष्ट्र एटीएसने (Maharashtra ATS) अटक केलेल्या दोन संशयित दहशतवाद्यांच्या कोठडीत वाढ झाली आहे. न्यायालयाने दोन्ही आरोपींना 4 नोव्हेंबरपर्यंत महाराष्ट्र एटीएसकडे कोठडी दिली आहे. दिल्ली स्पेशल सेल आयोजित केल्यानंतर महाराष्ट्र एटीएसने संशयित दहशतवादी कारवायांच्या आरोपाखाली दोन जणांना अटक केली होती. एका आरोपीचे नाव झाकीर शेख आणि दुसऱ्या आरोपीचे नाव रिझवान मोमीन आहे. एटीएसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना अनेक पुरावे मिळाले आहेत, ज्याच्या आधारे या आरोपींच्या कोठडीची पुन्हा मागणी करण्यात आली. दोन्ही आरोपी न्यायालयीन कोठडीत होते आणि आता 4 नोव्हेंबरपर्यंत ते एटीएस कोठडीत राहणार आहे.

दरम्यान, महाराष्ट्र एटीएस (ATS) आणि मुंबई पोलीस यांनी संयुक्त कारवाई करत एका संशयित दहशतवाद्याला ताब्यात घेतले होते. त्याचे नाव झाकीर आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या इशाऱ्यावर मुंबईसह देशभरात सणांच्या पार्श्वभूमीवर घातपात घडवण्याचा डाव दिल्ली पोलिसांनी उधळून लावत, पाकिस्तान समर्थित दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश केला आणि पाकिस्तान-आयएसआय प्रशिक्षित ६ दहशतवाद्यांना १४ सप्टेंबरला अटक केली होती. आता त्यांच्याशीच निगडित असणाऱ्या झाकीर नावाच्या संशयित दहशतवाद्याला अटक करण्याची मोठी कामगिरी एटीएसने केली आहे.

संशयीत दहशतवादी झाकीरला जोगेश्वरी भागातून अटक करण्यात आली होती. महाराष्ट्र एटीएस आणि मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने दिल्ली पोलिसांनी पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी मॉड्यूलचा भांडाफोड केल्याप्रकरणी झाकीरला अटक केले होते. झाकीरला यापूर्वी देखील दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाकडून दहशतवादी जान मोहम्मद शेख उर्फ ​​समीर कालियाकडून शस्त्रे आणि स्फोटके मुंबईत आणल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Priyanka Gandhi : वायनाड पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा दणदणीत विजय; मोकेरी यांना 4 लाखांच्या फरकाने हरवलं

Uddhav Thackeray : लाटेपेक्षा त्सुनामी आली; महायुतीच्या विजयावर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: महिला असुरक्षित,बेकारी वाढतेय- उद्धव ठाकरे

Mental Health: मानसिक आरोग्य संतुलित ठेवण्यासाठी 'या' गोष्टींचा करा आहारात समावेश

Health: शरीरासाठी आवश्यक पदार्थ कोणकोणते? जाणून घ्या एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT