Navi Mumbai Airport Saam TV
मुंबई/पुणे

Navi Mumbai Airport News : नवी मुंबई विमानतळ रेल्वे मार्गाने जोडले जाणार; केंद्र सरकारचा मास्टरप्लान तयार

Navi Mumbai NEws : प्रधानमंत्री गतिशक्ती योजनेअंतर्गत नागरी विमान वाहतूक मंत्रालय आणि रेल्वे मंत्रालयाने संयुक्त उपक्रमासाठी भागीदारी केली आहे.

प्रविण वाकचौरे

New Delhi News :

देशातील तीन नव्याने तयार होत असलेले विमानतळ रेल्वेने जोडण्याची योजना केंद्र सरकार आखत आहे. यामध्ये नवी मुंबईतील विमातळाचाही समावेश आहे. नवी मुंबई विमानतळापर्यंत रेल्वे कनेक्टिव्हिटीसाठी प्रयत्न केले जात आहेत.

प्रधानमंत्री गतिशक्ती योजनेअंतर्गत नागरी विमान वाहतूक मंत्रालय आणि रेल्वे मंत्रालयाने एकत्र काम करण्याचा निर्णय घेतला आहे. नवी मुंबई, नोएडा आणि धोलेरा या तीन महत्त्वाच्या बांधकामाधीन विमानतळांना रेल्वे वाहतूक कनेक्टिव्हिटीने जोडण्याचे यामध्ये उद्दिष्ट आहे.

बिझनेस स्टँडर्डच्या वृत्तानुसार, नवी मुंबई विमानतळाला रेल्वेने जोडण्यासाठी डिसेंबर 2024 पर्यंत रेल्वे स्टेशन बांधणे, ट्रॅक टाकणे या योजनेचा समावेश आहे. यासाठी नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव गेल्या काही महिन्यांपासून एकत्र काम करत आहेत. 8 मे रोजी ज्योतिरादित्य शिंदे यांनी वैष्णव यांना पत्र लिहून तीन विमानतळांना रेल्वेने जोडण्याची विनंती केली होती. यासाठी 10 जुलै रोजी दोन्ही नेत्यांची भेटही झाली. (Latest News Update)

विमानतळाच्या मास्टरप्लॅननुसार रेल्वे मंत्रालय रेल्वे प्रकल्पाची टाइमलाईन ठरवेल आणि ती नागरी विमान वाहतूक मंत्रालयाशी शेअर केली जाईल, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला होता. गेल्या महिन्यात, ज्योतिरादित्य शिंदे यांनी वैष्णव यांना आणखी एक पत्र लिहून प्रकल्पाच्या टाइमलाइनबद्दल माहिती देण्याची विनंती केली होती.

तिन्ही विमानतळांमध्ये नवी मुंबई विमानतळ हे खूप महत्वाचे आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ दरवर्षी 9 कोटी प्रवासी प्रवास करतील. नवी मुंबई विमानतळ डिसेंबर 2024 पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. त्यामुळे हे विमानतळ लवकरात लवकर रेल्वे वाहतुकीशी जोडणे गरजेचे आहे. विमानतळ उभारण्यापूर्वी त्याच्या खाली रेल्वे स्थानक बांधणे आवश्यक आहे, असं ज्योतिरादित्य शिंदे यांनी म्हटलं.

जागेच्या सर्वेक्षणाला रेल्वेची परवानगी

नवी मुंबई प्रकल्पाला प्राधान्य देण्यात आले असून त्यासाठीच्या जागेच्या सर्वेक्षणाला रेल्वेने परवानगी दिला आहे. मात्र, हे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी किती मुदत देण्यात आली आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या संदर्भात विमान वाहतूक मंत्रालयाला काही माहिती देण्यात आली आहे की नाही हे देखील कळू शकलेले नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Boondi Ladoo Recipe: संध्याकाळी लागलेल्या भूकेसाठी झटपट बनवा टेस्टी बुंदी लाडू

Maharashtra Live News Update: CM देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पंढरपुरात आरोग्यवारी सोहळा

Nitesh Rane : विषय थेट अंतरपाटापर्यंत गेला, यांच्यामध्ये नवरदेव कोण अन् नवरी कोण? नितेश राणेंचा खोचक सवाल

Thackeray: पुष्पा ते लाडकी बहीण, मुंबईत ठाकरेंची तोफ धडाडली; उद्धव ठाकरेंच्या भाषणातील ठळक मुद्दे

Banana Cake: घरीच झटपट बनवा सॉफ्ट अन् टेस्टी बनाना केक, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT