Breaking : नागपुरात निवडणुकीच्या आदल्या दिवशी काँग्रेसनं बदलला उमेदवार... SaamTV
मुंबई/पुणे

Breaking : नागपुरात निवडणुकीच्या आदल्या दिवशी काँग्रेसनं बदलला उमेदवार...

नागपूर विधान परिषद निवडणुकीमध्ये मोठी घडामोड घडली आहे. कॉंग्रेसनं निवडणुकीच्या आदल्या दिवशीच आपला उमेदवार बदलविला आहे. मतदानाला अवघे काही तास उरले असताना काँग्रेसनं हा निर्णय घेतला आहे.

अमोल कविटकर साम टीव्ही पुणे

पुणे : नागपूर विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये मोठी घडामोड घडली आहे. कॉंग्रेसनं निवडणुकीच्या आदल्या दिवशीच आपला उमेदवार बदलविला आहे. मतदानाला अवघे काही तास उरले असताना काँग्रेसनं छोटू भोयर यांच्या (Chhotu Bhoyar) ऐवजी अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख (Mangesh Deshmukh) यांना काँग्रेसचा पाठिंबा देण्याचं ठरवलं आहे. त्यामुळे अखेर काँग्रेसवरती उमेदवार बदलविण्याची नामुष्की आली असल्याच्या चर्चा खऱ्या ठरल्या आहेत.

हे देखील पहा -

दरम्यान उमेदवार बदलविण्याबाबत पक्ष श्रेष्ठीनं पत्र देऊन दिली संमती घेतली असल्याचं महसुल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी पुणे येथे स्पष्ट केलं.

आज थोरात पुण्यातील भाषणामध्ये म्हणाले, 'आज लोकशाही बचाव म्हणण्याची वेळ का येते? याचा विचार करण्याची गरज असून सर्वात मोठा लोकशाही प्रधान देश आज जगात 51 व्या क्रमांका वर आला आहे. वेगळ्या पद्धतीने राजकारण सुरु झालं आहे आधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा लोकशाहीला होईल अस वाटलं होतं पण 2012 पासून या तंत्रज्ञानावापर हा राजकीय नेत्यांची बदनामी करण्यासाठी केला गेला नवी झुंडशाही निर्माण झाली, त्याचा परिणाम हा मतांवर झाला. भाजपने लोकशाही मूल्यांना तिलांजली देण्याचं काम केलं.' असल्याचा आरोपही यावेळी काँग्रेस (Congress) नेते बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs SA: पैसा वसूल मॅच! संजू - तिलकची शतकं; भारताने उभारला रेकॉर्ड ब्रेकिंग स्कोअर

Assembly Election: भुसा पाडायला आलोय, दादा भुसेंवर टीकास्त्र; शिंदे सेनेच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली !

Sanju Samson Six: खूप जोरात लागला..संजूच्या षटकारामुळे महिला फॅनला रडू कोसळलं - VIDEO

IND vs SA: संजू सॅमसनने खेचला 1500 वा षटकार! टीम इंडियाच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद

Assembly Election: बटेंगे तो कटेंगेला भाजपातूनच विरोध; पंकजा मुंडेंनंतर अशोक चव्हाणांचाही विरोध

SCROLL FOR NEXT