...त्यामुळे आरोग्य विभागाची परीक्षा देणारे विद्यार्थी म्हणताहेत; 'आता राजेश टोपे कुठं आहेत?'

'आरोग्य विभागाच्या परिक्षेत काही झालंच नाही' असं म्हणणारे आरोग्यमंत्री कुठं आहेत? असा प्रश्न आता स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी विचारताहेत. म्हणूनच टोपेंभोवती वादाचं वारं घोगवंत आहे.
...त्यामुळे आरोग्य विभागाची परीक्षा देणारे विद्यार्थी म्हणताहेत; 'आता राजेश टोपे कुठं आहेत?'
...त्यामुळे आरोग्य विभागाची परीक्षा देणारे विद्यार्थी म्हणताहेत; 'आता राजेश टोपे कुठं आहेत?'SaamTV
Published On

पुणे : आरोग्य विभागाच्या परीक्षा (Health Department Exams) घोटाळ्याची व्याप्ती वाढत असताना या प्रकारात आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची भूमिका विद्यार्थ्यांना पटत नसून टोपे यांनी पेपरफुटीचं रॅकेट ओपन होण्याआधी काहीच झालं नसल्याचं म्हटलं होतं, त्यामुळे स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांचा रोष हा टोपेंवरही आहे. त्यातच विद्यार्थ्यांनी प्रकरणाची व्याप्ती पाहता आता CBI ने चौकशी करण्याची मागणी केली आहे.

हे देखील पहा -

'आरोग्य विभागाच्या परिक्षेत काही झालंच नाही' असं म्हणणारे आरोग्यमंत्री राजेश टोपे आहेत कुठं आहेत? असा प्रश्न आता स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी विचारताहेत. म्हणूनच टोपेंभोवती वादाचं वारं घोगवंत आहे. परीक्षा झाल्या झाल्या विद्यार्थ्यांनी पेपर टेलिग्रामवर (Telegram) फुटल्याचा आरोप केला. पण हा गंभीर आरोप टोपेंसह आरोग्य विभाग मान्य करायला नव्हतं. मात्र ज्यावेळी या सर्व प्रकरणात पुण्याच्या सायबर क्राईममध्ये गुन्हा दाखल झाला आणि बडे बडे मासे गळाला लागले तेव्हा मात्र सर्वांचेच धाबे दणाणले.

...त्यामुळे आरोग्य विभागाची परीक्षा देणारे विद्यार्थी म्हणताहेत; 'आता राजेश टोपे कुठं आहेत?'
धक्कादायक : मुक्या प्राण्यांवरील अत्याचाराचा कहर.. 50 पेक्षा जास्त गायींना जिवंत गाडलं

गुन्हा दाखल झाल्यापासून एक एक जण गळाला लागत गेला. धागेदोरे वर वर जाऊ लागले. तसं तशी विद्यार्थ्यांनी राजेश टोपेंच्या (Health Minister Rajesh Tope) राजीनाम्याची मागणी करत आहेत. इतकंच नाही तर पेपर फुटला हे उघड झाल्यानंतरही पेपर रद्द का करत नाही? असा सवालही विद्यार्थ्यांनी विचारला मात्र यावर टोपे काहीही भूमिका घ्यायला तयार नाहीत म्हणूनच विद्यार्थ्यांनी आता हा तपास CBI कडे द्यावा, अशी मागणी केली आहे.

स्पर्धा परीक्षा (Competitive Examination) देणारे विद्यार्थी पै ना पै जमवून स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करतात. दिवसरात्र अभ्यास करुन शासकीय शासकीय नोकरी मिळेल, ही आस त्यांच्या डोळ्यात असते. पण आरोग्य विभागातील काही झारीतल्या शुक्राचार्यांमुळे विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना सुरुंग लागतोय. त्यामुळेच राजेश टोपे यांनी या प्रकरणात खमकी भूमिका घ्यावी, अशी विद्यार्थी मागणी करत आहेत.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com