धक्कादायक : मुक्या प्राण्यांवरील अत्याचाराचा कहर.. 50 पेक्षा जास्त गायींना जिवंत गाडलं

या प्रकरणाची माहिती मिळताच शासनाने त्वरीत कारवाई करत तेथील अधिकाऱ्याला (EO) निलंबित करण्यात आलं आहे.
धक्कादायक : मुक्या प्राण्यांवरील अत्याचाराचा कहर.. 50 पेक्षा जास्त गायींना जिवंत गाडलं
धक्कादायक : मुक्या प्राण्यांवरील अत्याचाराचा कहर.. 50 पेक्षा जास्त गायींना जिवंत गाडलंSaamTV
Published On

मुंबई : उत्तर प्रदेश (UP) मधील बांदा जिल्ह्यात एक अत्यंत संतापजनक घटना घडली असून मुक्या प्राण्यांवरिल अत्याचारांची परिसीमा गाठणारी ही घटना आहे. एका गोशाळेतील 50 गायींना जंगलात जिवंत गाडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

हे देखील पहा -

बांदा जिल्ह्यातील नरैनी नगर पंचायत येथील मोतियारी बाजारातील गोशाळेमधील जवळपास 50 गायींना (cows) जंगलामध्ये जिवंत पुरण्यात आलं आलं आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच शासनाने त्वरीत कारवाई करत तेथील अधिकाऱ्याला (EO) निलंबित करण्यात आलं आहे. मात्र या प्रकरणावरुन नरैनी येथील भाजपचे (BJP) आमदार राजकरन कबीर यांनी दोषींविरोधात कडक कारवाईची मागणी केली आहे. मुख्य विकास अधिकारी वेद प्रकाश मोर्य यांनी दिलेल्या माहितीनुसार तब्बल 50 गायींना जिवंत गाडल्याच्या प्रकरणात तेथील EO दोषी आढळून आला आहे.

धक्कादायक : मुक्या प्राण्यांवरील अत्याचाराचा कहर.. 50 पेक्षा जास्त गायींना जिवंत गाडलं
आधी विहिरीत ढकललं, मग डोक्यात दगड घातला! मोबाइलसाठी भाऊच भावाच्या जीवावर उठला

मात्र हा केवळ छोट्या अधिकाऱ्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला जात असून मोठ्या अधिकाऱ्यांवर कारवाई कधी होणार? असा प्रश्न भाजप आमदारांनी उपस्थित केला आहे. दरम्यान मध्य प्रदेशातील (MP) पन्ना जिल्ह्यातील पहाडी खेरा जंगलामध्य़े 50 पेक्षा जास्त गायींना जिवंत गाडण्यात आलं होतं त्यामध्येदेखील उपजिल्हाधिकारी नरैनीही सहभागी होते. आणि यामुळेच भाजप आमदारांनी मुख्य विकास अधिकारीच्या तपासावर शंका व्यक्त केली आहे.

Editted By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com