Imtiaz Jaleel slams Shinde Fadnavis government over accidents on Samruddhi Highway Saam TV
मुंबई/पुणे

Imtiyaz Jaleel: मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीसांवर हत्येचा गुन्हा दाखल करा; इम्तियाज जलील कडाडले

Satish Daud

Imtiyaz Jaleel on Samruddhi Mahamarg Accident

विकासाचा महामार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समृद्धी महामार्गावरील अपघातांचं सत्र सुरुच आहे. सोमवारी (१५ ऑक्टोबर) समृद्धी महामार्गावरील छत्रपती संभाजीनगर येथे एका खासगी बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात आतापर्यंत १२ प्रवाशांचा मृत्यू झालाय. तर जवळपास २३ प्रवासी जखमी झाले आहेत. दरम्यान, यावरुन विरोधकांची राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरलंय. (Latest Marathi News)

इम्तियाज जलील ठाण्यातील मुंब्रा परिसरात आले होते. यावेळी त्यांनी समृद्धी महामार्गावरील अपघातांवरुन सरकारला चांगलेच खडेबोल सुनावले आहेत. समृद्धीवरील अपघातांचे प्रमाण वाढतंच चालले आहे. माणसाच्या मृत्युची किंमत स्वस्त झाली आहे. नुसत्या मुंबईत बसून घोषणा करणे योग्य नाही. सरकारने अपघाताचे स्पॉट निश्चित केले पाहिजे, असं जलील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, खासदार इम्तियाज जलील यांनी थेट मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तसेच काही दिवसांपूर्वी देखील समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला होता. त्यावेळी मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी केली होती.

आताही ती करत आहे, असं जलील म्हणत जलील यांनी शिंदे-फडणवीस यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, समृद्धी महामार्गावरील अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना केंद्र सरकार आणि राज्य सरकारने मदत जाहीर केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबद्दल शोक व्यक्त केला आहे. तसेच या अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाख रुपये आर्थिक मदतीची घोषणा केली असून जखमींवर शासकीय खर्चाने योग्य ते उपचार करावेत असे निर्देश दिले आहेत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या घटनेवर शोक व्यक्त करत मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी २ लाखांची मदत जाहीर केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IOCL Recruitment: इंडियन ऑइलमध्ये अधिकारी होण्याची संधी; या पदासाठी सुरु आहे भरती; वाचा संपूर्ण माहिती

Nandurbar News : नंदुरबार दंगल..दगडफेक करणाऱ्या ४० जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात; शहरात तणावपूर्ण शांतता

Manoj Jarange Patil: उपोषणाचा चौथा दिवस, प्रकृती खालावली; मनोज जरांगेंचा उपचार घेण्यास नकार

Maharashtra News Live Updates: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार

Bigg Boss Marathi : कालपर्यंत कडू होतं? निक्कीचा अरबाजला सवाल, बिग बॉसच्या घरात नेमकं काय चाललंय?

SCROLL FOR NEXT