Mumbai Local Train Mega Block saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Mega Block: मुंबईकरांसाठी महत्वाची अपडेट, रेल्वेच्या 'या' मार्गावर मंगळवारी मध्यरात्रीपासून विशेष ब्लॉक

Mumbai Local Train Mega Block: पश्चिम रेल्वेने आज मंगळवारी मध्यरात्री १:१० ते उद्या बुधवारी पहाटे ४:४० पर्यंत विशेष ब्लॉक घोषित केला आहे.

Satish Daud

Mumbai Local Train Mega Block News

मुंबई लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे. पश्चिम रेल्वेने आज मंगळवारी मध्यरात्री १:१० ते उद्या बुधवारी पहाटे ४:४० पर्यंत विशेष ब्लॉक घोषित केला आहे. अंधेरी येथील गोपाळ कृष्ण गोखले रेल्वे उड्डाणपुलाच्या कामांसाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉकदरम्यान लोकलच्या अनेक फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

त्यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी वेळापत्रक पाहूनच नियोजन करावं, असं आवाहन रेल्वे प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं आहे. रेल्वेने अचानक पश्चिम मार्गावर ब्लॉक घोषित केल्याने रात्री उशीरा आणि पहाटे कामावर निघणाऱ्या चाकरमान्यांचा खोळंबा होण्याची शक्यता आहे.

रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, अंधेरीस्थित गोपाळ कृष्ण गोखले रेल्वे उड्डाणपुलाचं काम मंगळवारपासून सुरू होणार आहे. या कामासाठी पश्चिम रेल्वेवरील पाचव्या-सहाव्या मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. (Latest News)

त्यामुळे विरार येथून अंधेरीसाठी रात्री १०.१८ वाजता सुटणारी लोकल रद्द करण्यात आली आहे. तर वसई रोड ते अंधेरी रात्री ११.१५ वाजेची लोकल रद्द करण्यात आली आहे. याशिवाय चर्चगेट-विलेपार्ले मध्यरात्री १२.३० वाजता सुटणाऱ्या लोकलची फेरी देखील रद्द करण्यात आली आहे.

बुधवारी पहाटे ४.२५ वाजून सुटणारी अंधेरी ते विरार, पहाटे ४.०५ वांद्रे-बोरिवली, बोरिवली-चर्चगेट, अंधेरी-विरार आणि पहाटे ४.०५ वाजता सुटणाऱ्या अंधेरी-चर्चगेट लोकलच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे घराबाहेर पडण्यापूर्वी वेळापत्रक पाहणं गरजेचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

New Year Trip : मुंबई-पुणे मुंबई! न्यू इयर ट्रिप होईल खास, स्वस्तात मस्त ठिकाणांची यादी

Maharashtra Live News Update: शिरपूर तालुक्यातील भरवाडे शिवारात बिबट्या पडला कोरड्या विहिरीत

Masala Sandwich Pav Recipe : स्ट्रीट स्टाइल झणझणीत मसाला सँडविच पाव, ऑफिसवरून आल्यावर १० मिनिटांत बनवा

Rava Burfi Recipe: गोड खाण्याची इच्छा होते? मग घरच्या घरी झटपट बनवा टेस्टी रवा बर्फी, नोट करा रेसिपी

Maharashtra Politics: महायुतीमध्ये पुन्हा नाराजीचा सूर, सुधीर मुंगटीवारांसह सत्तेतील आमदार सरकारच्या कामावर नाखूश

SCROLL FOR NEXT