Weather Update 8 June 2024 Saam TV
मुंबई/पुणे

Weather Forecast : राज्यात आजपासून पुढील ५ दिवस कोसळणार तुफान पाऊस; IMD कडून अनेक जिल्ह्यांना अलर्ट

Maharashtra Rain News : राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये आजपासून पुढील ५ दिवस मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे.

Satish Daud

देशातील वातावरणात मोठा बदल झाला असून सध्या ७ ठिकाणी वाऱ्याची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. त्यातच गोवा किनारपट्टीवरील अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे पुढील ५ ते ६ दिवस राज्यात ठिकठिकाणी पावसाचा जोर वाढणार आहे. मुंबईसह पुण्याला रविवारपासून अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

भारतीय हवामाना खात्याने शुक्रवारी मुंबईसह उपनगरात पावसाचा इशारा दिला होता. मात्र, पाऊस तर सोडाच पण मुंबईकरांना असह्य उकाड्याला सामोरे जावे लागले. तापमानाचा पारा वाढल्याने मुंबईकर हैराण झाले होते. दरम्यान, येत्या रविवारपासून मुंबईसह पुण्याला जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

आयएमडीच्या माहितीनुसार, मान्सून हा तळकोकणात पोहचला असून सातारा सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांत जोरदार पाऊस सुरू आहे. पुणे शहराला देखील पावसाने चांगलंच झोडपून काढलं आहे. येत्या २४ तासांत मौसमी वारे मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे.

त्यामुळे मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गाला पावसाचा इशारा देण्यात आलाय. उत्तर महाराष्ट्रातही जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नाशिक, धुळे, जळगाव, नंदुबार, या जिल्ह्यांत पाऊस पडण्याची शक्यता आहे. दुसरीकडे अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, हिंगोली आणि परभणीतही पावसाचा अंदाज आहे.

विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, नागरपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, वाशिम, चंद्रपूर जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. सध्या राज्यभरात पाऊस कोसळत असला तरी, हा पेरणीयोग्य पाऊस नाही. त्यामुळे जमिनीत ६ इंच ओलावा जाईपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणीचा निर्णय घेऊ नये, असा सल्ला कृषी विभागाकडून देण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ऐन निवडणुकीच्या धामधुमीत मनसेला भगदाड! बड्या नेत्याचा इंजिनला जय महाराष्ट्र, राज ठाकरेंना मोठा धक्का|VIDEO

Maharashtra Live News Update: हसन मुश्रीफ यांचा पुन्हा एकदा सतेज पाटील यांना इशारा

घोटाळा झाला! लालूप्रसाद यादवांचं अख्खं कुटुंब अडचणीत; राबडी, तेजस्वी, तेजप्रताप, मीसा भारतींसह ४६ जणांवर आरोपनिश्चिती

Drinking water: तुम्हीही उभं राहून पाणी पिता? आजच बदल ही सवय; ४ आरोग्य समस्या उद्भवू शकतात

Nagpur Politics: नागपूरमध्ये भाजपकडून मोठी कारवाई, ३२ पदाधिकाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन

SCROLL FOR NEXT