Mumbai Rain News Saam TV
मुंबई/पुणे

Weather Forecast : मुंबईसह उपनगरात पुढील ४ दिवस कोसळणार पाऊस; महाराष्ट्रात कसं असेल हवामान? वाचा वेदर रिपोर्ट

Satish Daud

मुंबईसह उपनगरात आजपासून पुढील ४ दिवस हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. महाराष्ट्रात अंशत: ढगाळ वातावरण राहणार असून काही जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळतील, अशी शक्यताही वर्तवण्यात आली आहे. सोमवारी सकाळपासून मुंबईत ढगाळ वातावरण होते.

मागील काही दिवसांपासून राज्यातील हवामानात सातत्याने बदल होत आहेत. कुठे तापमानाचा पारा वाढत आहे, तर कुठे अवकाळी पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. अकोल्यातील तापमान ४५ अंश सेल्सिअसवर गेलं आहे. दुसरीकडे मुंबईत दमट वातावरण असल्याने नागरिकांना उकाडा जाणवत आहे.

मुंबईत पावसाची शक्यता

पहाटेपासून उकाड्याची जाणीव होत असल्याने मुंबईकर हैराण झाले आहेत. दरम्यान, पुढील तीन-चार मुंबईसह उपनगरात ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे. त्याचबरोबर आजपासून ४ दिवस हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांना देखील पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

महाराष्ट्रात कसं असेल हवामान?

भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार, येत्या २४ तासांत मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुणे, रत्नागिरी, रायगड, कोकण, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत पावसाचा अंदाज आहे.

अहमदनगर, नाशिक, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धुळे, नंदुरबार, पालघर, ठाणे जिल्ह्यातही पावसाच्या सरी कोसळतील, असं हवामान खात्याने सांगितलं आहे. येत्या ३१ मेपर्यंत मान्सून केरळात दाखल होणार असून त्यानंतर १२ जूनपर्यंत मुंबईत येणार, अशी शक्यताही हवामान खात्याने वर्तवली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jarange vs BJP: मराठे भाजपचा एन्काऊंटर करणार; मनोज जरांगेंचा ट्रॅप, महायुतीला ताप?

Central Railway: मध्य रेल्वे मार्गावर कसाऱ्याजवळ स्पेशल पॉवर ब्लॉक, काही ट्रेनच्या मार्गात बदल तर काही रद्द; वाचा लिस्ट

Pune Crime: मोबाईल काढून घेतल्याने अल्पवयीन मुलाचा आईवर हल्ला, लाथाबुक्क्यांनी मारहाण अन् कात्रीने वार, पुण्यात खळबळ

Indian Oil Job: सरकारी नोकरीची संधी, इंडियन ऑइलमध्ये 'या' पदांसाठी निघाली भरती; अशा पद्धतीने करा अर्ज

Viral Video: मस्तच भावा! 'फुलवंती' गाण्यावर तरुणाचा गुलीगत डान्स; बेधुंद होऊन नाचला, VIDEO ला हजारोंची पसंती

SCROLL FOR NEXT