Badlapur crime news Saam TV Marathi
मुंबई/पुणे

महाराष्ट्रातील गर्भाशयातील बिजांड विक्रीच्या रॅकेटचा कसा झाला पर्दाफाश? धागेदोरे थेट बंगळुरू-तेलंगणात

Badlapur crime news : साम टीव्हीच्या स्टिंग ऑपरेशननंतर बदलापूरमध्ये सुरू असलेले अवैध बिजांड विक्री रॅकेट उघड झाले. पोलिसांनी छापेमारी करून औषधसाठा जप्त केला असून मल्टीस्टेट तपास सुरू आहे.

Namdeo Kumbhar

मयुरेश कडव साम टीव्ही न्यूज, बदलापूर

आता बातमी आहे साम टीव्हीच्या इम्पॅक्टची.... साम टीव्हीनं गर्भाशयातील बिजांड विक्रीचं रॅकेट चव्हाट्यावर आणलं...मात्र या बिजांड रॅकेटची पाळंमुळं कुठपर्यंत पसरलेत.. आणि सामच्या बातमीनंतर ह्या रॅकेटचा कसा पर्दाफाश केला जातोय...पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट....

बदलापूरमध्ये महिलांच्या गरिबी आणि अज्ञानाचा फायदा घेत गर्भाशयातील बिजांड विक्रीचा गोरखधंदा सुरु होता... मात्र साम टीव्हीनं बिजांड विक्रीचं रॅकेट चव्हाट्यावर आणलं... आणि पोलीस यंत्रणेला जाग आली... झोपलेली यंत्रणा अंग झटकून कामाला लागली...पोलिसांनी ठाणे, बदलापूर, विठ्ठलवाडी, वांगणी परिसरात छापेमारी केली....आणि तब्बल 10 लाखांपेक्षा जास्त किंमतीचा औषध साठा जप्त केला....विशेष म्हणजे .या बिजांड विक्रीच्या रॅकेटचे धागेदोरे परराज्यातही असल्याचं उघड झालंय. नाशिक आणि नागपूरसह बंगळुरू आणि तेलंगणातही याची पाळमूळं उघड झालीय.

यात तीनशेपेक्षा जास्त गरजू महिलांना पैशांचं आमिष दाखवून जाळ्यात अडकवल्याचं समोर आलंय. याची नेमकी मोडस ऑपरेंडी कशी होती ते पाहूयात........

बिजांडाच्या तस्करीची मोडस ऑपरेंडी

गरीब आणि गरजू महिलांना पैशांचं आमिष दाखवलं जायचं... त्यानंतर घरातच महिलांना घातक इंजेक्शन्स देऊन स्त्री बीजांची अवैध वाढ केली जायची... एवढंच नाही तर छुप्या पद्धतीनं महिलांच्या सोनोग्राफी, स्त्री बीजांच्या वाढीवर लक्ष दिलं जायचं...बिजांडांची पूर्ण वाढ झाल्यावर महिलांना IVF सेंटरमध्ये नेऊन गर्भाशयातील बिजांड काढली जायची... त्याच वेळी दलालांची फौज तयार असायची... काढलेलं बिजांड दलालांकडून अपत्य न होणाऱ्या महिलांना चढ्या दरानं विकली जायची.

अटक केलेल्या तीन महिलांच्या मोबाईलमधून केवळ एजंटच नाही, तर या रॅकेटमध्ये काही नामांकित डॉक्टर्स आणि हॉस्पिटल प्रशासनाचा हात असल्याचं उघड झालंय. साम टीव्हीच्या दणक्यानंतर जाग्या झाले पोलीस प्रशासनानं या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी आणि या गोरखधंद्यात सहभागी असलेल्यांच्या मुसक्या आवळण्याची गरज आहे....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Apurva Nemlekar Reception Photos: अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरच्या रिसेप्शनचे फोटो पाहिलात का?

लॅपटॉप समोर ठेवून करायचा लैंगिक अत्याचार, ७ महिन्यांच्या गरोदर महिलेलाही सोडलं नाही; भोंदू खरात प्रकरणात हादरावणारी माहिती उघड

Maharashtra News Live Update: पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ

MPSC Success Story: एमपीएससी परीक्षेत सोलापूरचा डंका; ४ तरुणांची उपजिल्हाधिकारी पदावर वर्णी

Pune : विनयभंगाच्या प्रकरणात अडकवण्याची धमकी, प्राचार्याकडून उकळले लाखो रुपये; पुण्यात ३ पोलिस अधिकाऱ्यांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT