पवई आयआयटी मधील साहिलच्या आत्महत्येप्रकरणी नवी माहिती समोर आलीय. साहिलचा परीक्षा वर्गातील सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आलाय. साहिल परीक्षा वर्गात काय करत होता ही बाब या व्हिडिओमधून समोर आली आहे.परीक्षेवेळी साहिल मोबाईल फोनचा वापर करत असल्यानं त्याला वर्गाबाहेर काढण्यात आले होते. त्यानंतर साहिलने वसतिगृहातील एका रूममध्ये आत्महत्या केली होती. आता या घटनेपूर्वीचा 20 मिनिटांचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आलाय.
व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये,साहिलने काळ्या रंगाचा टी-शर्ट घातलाय. परीक्षा कक्षातील पहिल्या रांगेत तो बसलेला दिसत आहे. त्यावेळी एक पर्यवेक्षक त्याच्याजवळ येतात. त्याच्या शेजारी थांबतात. मग साहिल काही वेळानंतर जागेवरून उठतो. नंतर पुन्हा बसताना आपला मोबाईल फोन त्या शिक्षकांकडे देतो. त्यानंतर त्यांच्यात चर्चा होते आणि मग तो आपल्या वस्तू गोळा करून परीक्षावर्गातून बाहेर पडताना दिसतोय. दरम्यान त्यानंतर साहिल वसतिगृहातील आपल्या रुमवर गेला आणि तेथे त्याने गळफास घेत जीवन संपवलं.
साहिलच्या मृत्यूबाबत आयआयटी मुंबईनं दु:ख व्यक्त करत माहिती दिली की, परीक्षेदरम्यान साहिलला मोबाईल फोन वापरताना पकडण्यात आले होते. प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी त्याने प्रश्नपत्रिका 'चॅटजीपीटी'वर (ChatGPT) अपलोड केली होती, परंतु त्याच्यावर कोणतीही शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली नव्हती.
साहिलच्या पालकांनी आरोप केला की, संस्थेत वाकोडेचा छळ केला जात होता. त्याने त्याच्यासोबत भेदभाव केला जात होता. साहिलचे वडील रवींद्र वाकोडे आणि आई सोनाली यांनी प्राध्यापक सूर्यनारायण दूला यांच्या अटकेचीही मागणी केली आहे. दूला यांनी साहिलशी भेदभाव केल्याचा आरोप करण्यात आलाय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.