सावधान ! पुणे - मुंबई महामार्गावर प्रवास करताय, मग गाडीची हवा तुम्हीच तपासा; नाहीतर फसाल SaamTV
मुंबई/पुणे

सावधान ! पुणे - मुंबई महामार्गावर प्रवास करताय, मग गाडीची हवा तुम्हीच तपासा; नाहीतर फसाल

पुणे - मुंबई महामार्गावर प्रवास करत असाल, तर तुम्हाला अतिशय सावध राहण्याची गरज आहे. कारण या महामार्गावर टायर पंक्चर (Puncture) काढणारे तुमची मोठी आर्थिक लूट करत आहेत.

गोपाल मोटघरे

पुणे : आपण आपल्या प्रवासाच्या गडबडीत आणि मोबाईलच्या (Mobile) नादात पंक्चर (Puncture) काढणाऱ्या दुकाणदारांकडे त्या दुकाणातील कामगारांकडे जास्त लक्ष देत नाही आणि तिथेच आपली फसवणूक होते. असाच प्रकार समोर आलाय जुन्या पुणे - मुंबई  महामार्गावर (Old Pune - Mumbai Highway) तुम्ही जर या महामार्गावरुन प्रवास करत असाल, तर तुम्हाला अतिशय सावध राहण्याची गरज आहे. कारण या महामार्गावर टायर पंक्चर (Tyre puncture) काढणारे तुमची मोठी आर्थिक लूट करत आहेत. ही टोळी तुमच्या गाड्या मुद्दाम पंक्चर करते आणि एका वेळेस, एकाच टायर मध्ये जवळपास 25 ते 30 पंक्चर काढते.

हे देखील पहा -

जुन्या पुणे - मुंबई महामार्गावर अशाच एका टायर पंक्चर करणाऱ्या टोळीच्या मुसक्या पुण्यातील खडकी पोलिसांनी (Khadki police) आवळल्या आहेत. दुचाकी चालक संदीप शिंदे यांच्या तक्रारी वरून खडकी पोलिसांनी मुद्दाम टायर पंक्चर करणारी टोळी गजाआड केली आहे. पुण्यातील फायनास कंपनी मध्ये काम करणारे संदीप शिंदे हे निगडी (Nigadi) येथे आपल्या नातेवाईकांकडे दुचाकीने जुन्या पुणे - मुंबई मार्गाने जात असताना, टायर पंक्चर करणाऱ्या टोळीने त्यांना टार्गेट केलं.

नक्की काय घडल -

संदीप शिंदे हे आपल्या दुचाकी वाहनाने निगडी कडे जात असताना, त्यांना दुसऱ्या दुचाकीस्वाराने सांगितले की; 'तुमच्या गाडीच्या मागील टायरमध्ये हवा कमी आहे. सोबतच समोर हवा भरण्याचा दुकान आहे असं देखील त्याने सांगितल. त्यानंतर आपल्या गाडीची हवा तपासण्यासाठी संदीप शिंदे त्या हवा भरणाऱ्या दुकानात पोहचले, त्याठिकाणी हवा चेक करत असताना संदीप पाटील यांच पंक्चर काढणाऱ्या कामगारांने, लक्ष विचलित करून त्यांच्या वाहनांच्या टायर मध्ये आपल्या पंक्चर काढणाऱ्या टोचनच्या सह्याने तब्बल 26 पंक्चर करून, संदीप पाटील यांच्या कडून तीन हजार रुपये वसूल केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे

संदीप पाटील यांनी दिलेल्या तक्रारी वरून खडकी पोलिसांनी मुद्दाम टायर पंचर करणाऱ्या टोळीतील 4 आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून, 2 आरोपींना तातडीने अटक केली आहे. यापूर्वी रस्त्यावर लोखंडी खिळे टाकून पंचर काढणारे दुकान दार वाहन चालकाची वाहन मुद्दाम पंचर करत असत. मात्र आता महामार्गावर असणारे पंक्चर काढणाऱ्या दुकानदाराची हिम्मत आणखी वाढली आहे. ग्राहक पंक्चर काढणाऱ्या दुकानदाराकडे फारस लक्ष देत नसल्याने या दुकानदारांचे फसवणूक करण्याचे प्रमाण वाढलं आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanjay Raut : मुख्यमंत्री महाविकास आघाडीचाच होणार; संजय राऊत यांचा दावा

Maharashtra Election : राज ठाकरेंना नांदगावमध्ये धक्का; मनसे उमेदवाराची निवडणुकीतून माघार, ठाकरे गटात प्रवेश

Maharashtra Election: नाशिकमध्ये भाजप - ठाकरे गटात राडा; पोलीस ठाण्याबाहेरच आमनेसामने, VIDEO

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा गौरव – "रुखवत" लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार

VIDEO : शाब्बास! असं धाडस करायला वाघाचं काळीज लागतं, तरुणानं ३ मजले चढून २ मुलांना आगीतून वाचवलं

SCROLL FOR NEXT