Jaydeep Thackeray Saam TV
मुंबई/पुणे

Jaydeep Thackeray Exclusive: आणखी एक ठाकरे राजकारणात? वडील शिंदे गटात मात्र जयदीप यांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा

उद्धव काकांनी जबाबदारी दिली तर पक्षासाठी नक्की काम करेन, असंही जयदीप यांनी सांगितलं.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

>> निवृत्ती बाबर

मुंबई : शिवसेनेत दोन गट तयार झाल्यानंतर ठाकरे कुंटुंबातील मतभेदही समोर आले आहेत. दसरा मेळाव्यात शिंदे गटाच्या स्टेजवर जयदेव ठाकरे, स्मिता ठाकरे, निहार ठाकरे उपस्थित होते. तर ठाकरे गटाच्या मेळाव्यात जयदेव ठाकरे यांचे पुत्र आणि दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे मोठे नातू जयदीप ठाकरे उपस्थित होते.

ठाकरे कुटुंबात दिवसेंदिवस दुरावतंय का अशी चर्चा सुरु आहे. एकीकडे ठाकरे कुटुंबातील अनेक सदस्य शिंदे गटाकडे जात असताना जयदीप ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यात जाण्याची भूमिका घेतली.

याबाबत बोलताना जयदीप ठाकरे यांनी म्हटलं की, मी आतापर्यंत दसरा मेळावा ऐकत होतो, पण यावर्षी प्रत्यक्षात गेलो. उद्धव काकांनी संधी दिली तर मी नक्की राजकारणात येईन. बाकी कुटुंब कोणाला पाठिंबा देतंय याबाबत मला बोलायचं नाही. मी बाळासाहेबांचा मोठा नातू म्हणून उद्धव काकांच्या दसरा मेळाव्यात गेलो.

Jaydeep Thackeray

मी सध्या मोठा नातू म्हणून जबाबदारी पार पाडतोय. मूळ शिवसेना कोणाची हे सर्वांना माहित आहे. शिवसेनेत दोन गट पडतील केव्हाच वाटलं नव्हतं. कोरोना काळात काका स्वतः आजारी असताना त्यांनी खूप चांगल काम केलं, असंही जयदीप यांनी म्हटलंय.

माझं क्षेत्र वेगळं आहे त्यामुळे मी लक्ष देत नव्हतो. पण कुटुंब अडचणीत आले म्हणून काकांना पाठिंबा देत आहे. उद्धव काकांनी जबाबदारी दिली तर पक्षासाठी नक्की काम करेन, असंही जयदीप यांनी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPS Officer Transfers: तुषार दोशींसह ९ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, पोलीस दलात खळबळ

Maharashtra News Live Update:- भाजपाला महिला आरक्षण द्यायचं नाही..केवळ राजकारण करायचे आहे - खासदार विशाल पाटील

Sun tan treatment: उन्हात चेहरा काळवंडतोय? सिरमसोबत ही एक गोष्ट लावा, चेहऱ्यावर लगेच येईल ग्लो

भाजपचे दिग्गज नेते पोहोचले पोलीस ठाण्यात; बड्या अधिकाऱ्याविरोधात केली तक्रार दाखल

LPG सिलिंडर पुरवठ्यावर सरकारनं दिली मोठी अपडेट; PNG बाबतही उचललं महत्वाचं पाऊल

SCROLL FOR NEXT