प्रामाणिकपणा असावा तर असा! ३ लाख ७० हजारांनी भरलेली बॅग भाविकाला दिली परत... प्रदीप भणगे
मुंबई/पुणे

प्रामाणिकपणा असावा तर असा! ३ लाख ७० हजारांनी भरलेली बॅग भाविकाला दिली परत...

डोंबिवलीच्या डायघर गावातील ग्रामस्थ नामदेव पाटील यांच्या प्रामाणिकतेची सर्वत्र चर्चा होतेय. मंदिरात पैशांनी भरलेली बॅग विसरलेल्या भाविकाला त्यांनी बॅग परत केली.

प्रदीप भणगे

डोंबिवली: प्रामाणिकपणा आणि माणुसकीचे दर्शन पुन्हा एकदा डोंबिवलीत घडले आहे. मंदिरात दर्शनासाठी आलेला भाविक ३ लाख ७० हजार रुपयांनी भरलेली बॅग मंदिरातच विसरला. ही पैशांनी भरलेली बॅग त्याला नामदेव पाटील नावाच्या एका प्रामाणिक गृहस्थाने परत केली आहे. (If there should be honesty; A bag full of 3 lakh 70 thousand was given back to the devotee)

हे देखील पहा -

डायघर गावातील हनुमानाचे मंदिर हे प्रसिद्ध आहे. त्यामुळे आठवड्याच्या प्रत्येक शनिवारी भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी इथे येत असतात. शनिवारी एका खासगी कंपनीमध्ये काम करणारे विकास चिंचपुरें हे शनिवारी मंदिरात दर्शन घेऊन गेले, मात्र आपली बॅग मंदिरातच विसरले होते. ही बॅग डायघर गावातील ग्रामस्थ नामदेव पाटील यांना सापडली. त्यांनी याची माहिती त्वरित पोलीस पाटील दिली आणि ग्रामस्थांना दिली. त्यानंतर बॅगेत असलेल्या कागदपत्रांच्या आधारे हि बॅग मुळ मालकाला परत केली. या बागेत तब्बल तीन लाख सत्तर हजार रुपये होते. हे पैसे आणि इतर साहित्य त्यांना परत करण्यात आले. त्यामुळे डायघर गावचे ग्रामस्थ नामदेव पाटील यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक केले जात आहेत आणि त्याचा सत्कार सुद्धा केला जात आहे.

कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील डायघर गावचे मंदिर हे सर्वत्र प्रसिद्ध आहे. ग्रामीण भागात मानवी वस्ती झपाट्याने वाढत असल्याने भक्त देखील दिवसेंदिवस अधिकच वाढत आहेत. शनिवारी मोठ्या संख्येने भाविक दर्शनाला मंदिरात येत असतात. शनिवारी एका कंपनीमधील कामगारांना पगार देण्यासाठी विकास चिंचपुरें हे सकाळी निघाले होते. मात्र नियमितपनणे दर्शनाला जाणारे चिंचपुरें दर्शनाआधी बॅग ही मंदिराबाहेर विसरून दर्शन करून निघून गेले होते. मात्र मंदिरात दर्शनासाठी गेलेले नामदेव पाटील यांना ही बॅग सापडली आणि त्यांनी तातडीने याची माहिती ग्रामस्थांना दिली. डायघर गावचे पोलीस पाटील आणि ग्रामस्थांनी बॅग मालक विकास चिंचपुरें यांना बॅगेत असलेल्या कागदपत्रांच्या आधारे चिंचपुरें यांच्याशी संपर्क साधत बॅग सापडल्याची माहिती दिली. 

फोन गेल्यानंतर विकास चिंचपुरें यांना बॅग विसरलो असल्याची आठवण झाली. या बॅगेमध्ये तब्बल 3 लाख 70 हजार रुपये होते. अखेर चिंचपुरें यांनी तातडीने डायघर गावाकडे धाव घेत आपली बॅग ताब्यात घेतली आहे. त्यामुळे डायघर गावचे ग्रामस्थ नामदेव पाटील यांच्या प्रामाणिक पणाचे कौतुक केले जात आहेत आणि डायघर गावचे पोलीस पाटील गजानन पाटील, मूर्तिकार योगेश पाटील आणि संतोष पाटील यांनी नामदेव पाटील यांचा सन्मान केला.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kitchen Hacks: काकडी कापण्यापूर्वी ती घासली का जाते? 'या' कारणांमुळे तुम्हीही कराल हा प्रयत्न

Heart attack young age: आजकाल कमी वयात का येतो हार्ट अटॅक? तज्ज्ञांनी सांगितलं तरूणांमध्ये हृदयविकार वाढण्याची कारणं

Maharashtra Live News Update: अमित शाह यांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या झाडाझडतीत एकाकडे सापडली पिस्तुल

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींना या योजनेचा लाभ घेता येणार नाही, आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं

Thane News : कुपोषित मुलीच्या उपचारासाठी पैसे नाहीत, आई-वडील हतबल; उपमुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील प्रकार

SCROLL FOR NEXT