आगरी, कोळी आणि वारकरी भवनासाठी १५ कोटींचा निधी मजूर...

या भवनामुळे नागरिकांना आगरी समाजाची ओळख, संस्कृती, जडणघडण, परंपरा, इतिहास, महत्व कळण्यास मदत होणार आहे.
आगरी, कोळी आणि वारकरी भवनासाठी १५ कोटींचा निधी मजूर...
आगरी, कोळी आणि वारकरी भवनासाठी १५ कोटींचा निधी मजूर...प्रदीप भणगे

दिवा: दिवा - बेतवडे गावात असलेल्या सुविधा भूखंडावर आता आगरी, कोळी आणि वारकरी भवन उभारले जाणार आहे. भवनाच्या उभारणीसाठी नगरविकास विभागाने तब्बल १५ कोटी रूपयांचा निधी मंजूर केला आहे. निधी मंजूर झाला म्हणून दिव्यातील शिवसेना नगरसेवक आणि पदाधिकारी यांनी फटाके वाजवत जल्लोष केला आहे. (15 crore fund for Agari, Koli and Warkari Bhavan)

हे देखील पहा -

नगरसेवक रमाकांत मढवी, दर्शना चरणदास म्हात्रे, सुनीता गणेश मुंडे, दीपक नामदेव जाधव यांनी या भवनाची आग्रही मागणी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडे केली होती. त्यासाठी विविध पातळ्यांवर डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पाठपुरावा केला. अखेर दिवा बेतवडे गावातील नियोजीत जागेवर आगरी, कोळी आणि वारकरी भवन उभारण्यासाठी नगरविकास विभागाच्या माध्यमातून १५ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. 

आगरी समाजातील बांधवांना आपली संस्कृती टिकवण्यासाठी, सांस्कृतिक उपक्रमांसाठी हक्काचे व्यासपीठ मिळावे या भावनेतून ठाणे महापालिका क्षेत्रातील दिवा बेतवडे गावात आगरी, कोळी आणि वारकरी भवन उभारण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे प्रयत्नशील होते. बेतवडे गावातील सर्व्हे क्रमांक ३६ हा भूखंड पालिकेच्या सुविधा वापरासाठी होता. येथे या भवनाच्या उभारणीसाठी निधीची आवश्यकता होती. स्थानिक नगरसेवक रमाकांत मढवी, सुनीता गणेश मुंडे, दर्शना चरणदास म्हात्रे, दीपक नामदेव जाधव यांनी या भवनाची आग्रही मागणी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडे केली होती. त्यासाठी विविध पातळ्यांवर डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पाठपुरावा केला. अखेर दिवा बेतवडे गावातील नियोजीत जागेवर आगरी, कोळी आणि वारकरी भवन उभारण्यासाठी नगरविकास विभागाच्या माध्यमातून १५ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. 

दिवाळीच्या सणात राज्य शासनाच्या नगरविकास विभागाचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलेल्या या निधीमुळे या भवनाच्या उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मंत्री एकनाथ शिंदे यांचे आगरी, कोळी आणि वारकरी बांधवांच्या वतीने आभार मानले आहेत. भवनात वारकऱ्यांसाठी स्वतंत्र दालन उभारले जाणार आहे. हे भवन सामाजिक बांधिलकीचे प्रतिक ठरेल अशी प्रतिक्रिया कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे.

आगरी, कोळी आणि वारकरी भवनासाठी १५ कोटींचा निधी मजूर...
Sooryavanshi | दिग्दर्शक रोहित शेट्टी आशिष चंचलानीच्या भेटीला थेट उल्हासनगरात...

असे असेल भवन

आगरी-कोळी समाजाची एक वेगळी ओळख, संस्कृतीचे दर्शन सर्वसामान्यांना व्हावी यासाठी या भवनात स्वतंत्र दालन उभारले जाणार आहेत. यात कलादालन, सभागृह, मंच, स्वच्छतागृह, प्रेक्षागृह अशा गोष्टी समाविष्ट असतील. या भवनामुळे नागरिकांना आगरी समाजाची ओळख, संस्कृती, जडणघडण, परंपरा, इतिहास, महत्व कळण्यास मदत होणार आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com